प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
बिहार मधील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध मंडळांच्या सहकार्याने, न्याय्य मागण्यांसाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने आज चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य शांती मोर्चा काढण्यात आला.
बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. बुद्धगया महाविहार हिंदू च्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आज मोर्चा काढण्यात आला. आता भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून बुद्धगया महाविहार येथे आंदोलन सुरू केली आहे आणि या आंदोलनासाठी निधीची कमतरता होऊ देणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले.
बौद्धांच्या अस्मिते च्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी झाले होते.



