प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
जांभुळघाट मंडळ अधिकारी सौ.रंजना ढोले या रात्रोच्या वेळी घटना स्थळावर आल्या नसताना आणि त्यांनी पोलिस स्टेशनला जमा असलेल्या दोन्ही हायवाची तपासणी/पहानी प्रत्यक्ष केली नसताना त्यांना कसे माहित की,माती मिश्रित वाळू दोन्ही हायवा मध्ये भरलेली होती?
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाटच्या मंडळ अधिकारी रंजना ढोले यांनी जो,”दोन्ही हायवा मध्ये माती मिश्रित वाळू भरलेली होती,असा जो असत्यावर आधारित अहवाल चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांना पाठविला,तो त्यांच्या पत्राला अनुसरून पाठविला असल्याचे पुढे आले आहे.
चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रिधर राजमाने हे सत्ताधारी आमदाराच्या दबावात आणि त्यांच्या आशिर्वादात खोटा अहवाल जांभुळघाट मंडळ अधिकाऱ्यांना सादर करायला लावतात आणि वाळू भरलेले दोन्ही हायवा विना अट,विना दंडात्मक कारवाई सोडून देतात,असे त्यांचे आमदारांच्या धाकातले मांडलिकत्वातंर्गतचे कर्तव्य भयंकर लाजिरवाणे,लोकशाहीला अनुसरून अभिप्रेत असलेल्या कर्तव्याला कलंकित करणारे आहे,चिमूर तालुक्यासह मौजा पिंपळगाव येथील नागरिकांसी धोकेबाजी आणि विश्वासघात करणारे आहे हे आता स्पष्ट झाले आहे..
म्हणूनच चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने हे वाळूच्या आणि मुरुमाच्या अवैध उत्खननाकडे सातत्याने दुर्लक्ष करीत होते आणि आहेत,हे वास्तव मंडळ अधिकाऱ्यांच्या बनावट व खोट्या अहवालानुसार पुढे आले आहे.
वाळू-मुरुम खनिज संपदेच्या अवैध उत्खननाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करणारे चिमूर तालुका तहसीलदार श्रिधर राजमाने हे पदाचा बिनधास्त दुरोपयोग करुन चिमूर तालुक्यातील वाळू आणि मूरुन सारख्या महत्त्वपूर्ण खनिज संपत्तीचे वारंवार आणि सातत्याने तस्करी अंतर्गत नुकसान करतात याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतातरी त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे.
तद्वतच तहसीलदार श्रिधर राजमाने हे वाळू व मुरुम तस्करी बाबत शांत राहात असल्याने ते कोणाच्या सांगण्यावरून अयोग्य काम करतात? आणि कर्तव्य पार पाडतात? आणि त्यांच्या कार्यकाळात किती रुपयांची खनिज संपदा आतापर्यंत चोरीला गेली,याबाबत महत्त्वपूर्ण गावात जाऊन नागपूर विभागीय आयुक्तांनी आपल्या चौकशी समिती द्वारे गोपनीय असी कसून चौकशी केली पाहिजे या मताची चिमूर तालुक्यातील जनता आहे.
तहसीलदार श्रिधर राजमाने हे इमानदार पत्रकारांना बेकायदेशीर कर्तव्यातंर्गत आमदारांच्या दबावात काम करतात काय?आणि कर्तव्य पार पाडतात काय? याबाबत सुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे.
तहसीलदार श्रिधर राजमाने यांना,जांभुळघाट मंडळ अधिकाऱ्यांनी दोन्ही हायवा मध्ये माती मिश्रित वाळू भरलेला असल्याबाबत खोटा अहवाल दिल्यावर भिसी पोलिस स्टेशनला खाजगी अभियंता श्री.स्वप्निल यावले यांनी पत्रकारांच्या बाबतीत खोटी तक्रार दाखल करण्याची हिंमत केली हे खरे वास्तव आता लपून राहिलेले नाही.
यापुर्वी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या कार्यकर्त्यांचे ट्रक,हायवा,ट्रॅक्टर सोडण्यासाठी चिमूर तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांकडून अशाच प्रकारे खोटे अहवाल चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी मागितले होते काय? याबाबत गंभीरता निर्माण झाली आहे.
खाजगी अभियंता स्वप्निल यावले हे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत सह भागिदार असल्याचे सुध्दा पुढे आले आहे.
यामुळे चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा आणि चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुक्कमा यांनी सर्व प्रकरणाची आपल्या स्तरावरुन विशेष चौकशी पथकाद्वारे निष्पक्ष चौकशी केली पाहिजे.
तुर्त एवढेच!



