दोन वर्षांपासून पंचायतराज व जि. प. व्यवस्थेतून ‘पदाधिकारी’ गायब… — नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, “अधिकारीराज”…

    सुधाकर दुधे

 सावली तालुका प्रतिनिधि 

        पंचायत राज व्यवस्थेत ‘त्रिसूत्री’ला विशेष महत्त्व आहे. ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी दरम्यानच्या काळात ७३ वी घटना दुरुस्तीकरून पंचायत राज व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गत दोन वर्षांपासून पंचायत राज व्यवस्थेतील त्रिसू‌त्रील दोनस्तरावर केवळ ‘अधिकारी राज’ असल्याने ग्रामीण भागातील विकासाला ब्रेक लागले आहे. मागील दोन वर्षापासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर अधिकारी राज आहे.

         पंचायत राज व्यवस्थेतील त्रिसूत्रीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशी व्यवस्था आहे. ग्रामीण भागात विकास कामे करण्यासाठी व गावाला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामे, नियोजन केली जातात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या कामांना मंजुरी देणे, प्रसंगी बरिष्ठ पातळीवर नियोजन पाठवून त्यासाठी निधीची मागणी करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जाते.

           तर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेचा दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. या तीनही ठिकाणी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालणा मिळत असते. मात्र, गत दोन वर्षांपासून पंचायत राज व्यवस्थेतील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच झाल्या नसल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक म्हणून अधिकारीच काम करीत आहेत.

           सावली तालुक्यातील स्थिती लक्षात घेता, अनेक गार्वापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहचू शकत नाही. सर्वच ठिकाणी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवू शकत नाहीत, त्यामुळे अशा ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांचा अनेक माध्यमातून विकासकामाना गती मिळत असल्याने स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अधिकारी काम पाहत आहेत

          तालुक्यात पंचायत समितीवर प्रशासक म्हणून अधिकारी काम पाहत आहेत जवळपास दोन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाच होत नसल्यामुळे नागरिकांचे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

        यासोबतच कोणत्या गावात कोणती समस्या आहे याची माहिती स्थानिक नागरिक आपले प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सदस्य अथवा जिल्हा परिषद सदस्यांना देत असतात अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे नागरिक गाऱ्हाणे मांडीत नाही.

कोट :-

निवडणुका होत नसल्याने विकास कामांना ब्रेक लागला आहे त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत। समितीच्या निवडणूका घेण्यात येऊन ग्रामीण भागातील विकास साधावा. 

   अनिल (मुन्ना)स्वामी

अध्यक्ष ,विविध कार्यकारी सहकारी संस्था ,सावली