बसपाला रोखणे अवघड… — देशांतर्गत निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम मशीन हटलीच पाहिजे?..

संपादकीय

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

       बसपाला थांबविण्यासाठी आडमार्गाने व सरळ मार्गाने हर संभव प्रयत्न केले जातात.मात्र बसपाचा जनाधार कमी होताना दिसत नाही किंवा बसपाला मानणारा वर्ग बसपा पासून दूर होताना दिसत नाही.

        यामुळे थकलेल्या विरोधक राजकारण्यांनी बसपाच्या विधानसभा उमेदवारांना मारणे,प्रचार करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या देणे सुरू केले आहे.बसपा उमेदवारांना मारण्याने किंवा बसपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यामुळे बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते परत पक्ष मजबूतसाठी व उमेदवार निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत.

          पक्ष पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची हिम्मतच तेलंगणा आणि राजस्थान राज्यात सत्ता परिवर्तन घडवून आणणार असेच तेथील राजकीय वातावरण आहे.

              सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले,आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज,युगपुरुष-युगपर्वतक-महामानव-बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर,जननायक मान्यवर कांशीरामजी यांची विचारधारा म्हणजे बसपाची विचारधारा असल्याने बसपा परिवर्तनशील व सर्वांना योग्य बनवणारी मिशनरी पार्टी आहे.

            बसपा पक्षात फोकांड्या घोषणांना व बनवाबनवीच्या धोरणांना अजिबात थारा नाही.सत्य तेच बोलणे व बोलल्याप्रमाणे कार्ये करणे, कर्तव्य पार पाडणे,असा नित्याचा क्रम असल्याने,हा पक्ष जनमानसात लोकप्रिय आहे व पुढे चालून हाच पक्ष देशाचा सुत्रधार होणार आहे.

             बसपा पक्ष देशाचा सुत्रधार बनू नये व या देशातील तमाम नागरिकांचे कल्याण आणि सर्व प्रकारची उन्नती करु नये म्हणून जातियवादी मानसिकतेतून व धार्मिक भावनेतून बसपाचा विरोध भांडवलदार व त्यांच्या मर्जीतील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना नेहमीच करतांना दिसतात.

          याचबरोबर ईव्हीएम मशीन द्वारा भारत देशात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच्या काळातंर्गत बसपाचा जनाधार कमी झाला असल्याचे वारंवार पुढे येत आहे.

      मात्र,लोकसभा व विधानसभा निवडणुका मतपत्रिका द्वारा झाल्यास बसपा या देशातील नंबर वन पार्टी बनून उदयास येईल हे वास्तव आहे.

          बसपाची भिती भांडवलदार व त्यांच्या मर्जीतील राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला आणि सामाजिक संघटनांच्या प्रमुखांना असल्यानेच भारत देशात मतपत्रिका द्वारा मतदान प्रक्रिया राबविली जात नाही असे दिसून येते आहे.

           ८ आक्टोंबर २०१३ च्या सर्वोच्च न्यायालय निर्णयानुसार ईव्हीएम मशीन द्वारा पारदर्शक,भयमुक्त व विश्वासपात्र वातावरणात निवडणूका होत नाही असे स्पष्ट झाले आहे.

***

डॉ.सुब्रमण्यम स्वामी…

           तद्वतच भाजपचे राज्यसभेतील खासदार अँड.सुब्रमण्यम स्वामी यांनी जपान देशाचे उदाहरण देऊन सांगितले आहे की,”ईव्हीएम मशीन बनवणारा जपान देश हा मतपत्रिका द्वारा पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडतो आहे.जपान देश जर मतपत्रिका द्वारा निवडणूक प्रक्रिया पार पाडत असेल तर भारत देशात मतपत्रिका द्वारा निवडणूक प्रक्रिया का म्हणून राबविली जात नाही?हा प्रश्न उपस्थित होतोच..

            त्यांनी पुढे म्हटले आहे की ईव्हीएम मशीन मध्ये लावलेल्या चिपवर जपान देशाचा अजिबात विश्वास नाही.अर्थात चिप द्वारा निवडणूक प्रक्रिया अंतर्गत गडबड केली जाते हे भाजपा खासदार डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी परखडपणे सांगितले आहे.

           अनेक तर्कसंगत व वास्तविक आधारावर त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात,”ईव्हीएम मशीन विरोधात,प्रथमतः याचिका दाखल केली होती व त्यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान ८ आक्टोंबर २०१३ ला निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ईव्हीएम मशीन द्वारा पारदर्शक,भयमुक्त,व विश्वासपात्र निवडणूका होत नाही.

****

ईव्हीएम मशीन..

           ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या जपान देशाचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही आणि सर्वोच्च न्यायालय म्हणते की ईव्हीएम मशीन द्वारा पारदर्शक,भयमुक्त व विश्वासपात्र वातावरणात निवडणूका होत नाही.याचाच अर्थ असा की ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुकातंर्गत गडबड केली जात असावी असा संशय घेण्यास पुर्णतः वाव आहे.

         म्हणूनच वेळेचा बहाना समोर करून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त हे देशांतर्गत मतपत्रिका द्वारा निवडणूका घेण्यास नकार देतात असे भारत देशातील मतदारांनी व नागरिकांनी समजायचे काय?हा मुद्दा लोकांच्या हितासाठी महत्त्वाचा आहे..

***

बसपाचे नुकसान आणि ईव्हीएम मशीन..

             ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुकातंर्गत बसपाला झड बसत असेल आणि बसपाला वारंवार मागे पडावे लागत असेल तर ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका थांबविण्यासाठी वेळ न दवडता बसपाला जन-आंदोलन करावे लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

          बसपा जवळ आजच्या स्थितीत प्रचंड जनशक्ती असल्याने ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुकांना थांबविण्यासाठी बसपा यशस्वी होऊ शकते असे म्हणणे अनुचित नाही.

         बसपाचे नुकसान म्हणजे या देशातील सर्व नागरिकांचे नुकसान आहे हे देशातील नागरिकांनी लवकर समजून घेतले पाहिजे..

***

  अवघड..

            मध्यप्रदेश,छत्तीसगड, राजस्थान व तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत बसपाला थोपविण्यासाठी जे षडयंत्र आखली जात आहेत ते पाहता बसपा चारही राज्यातील विधानसभा निवडणूकी अंतर्गत चांगला निकाल खेचले असे स्पष्ट समिकरण आहे.