बाळासाहेब सुतार
निरा नरशिहपुर प्रतिनिधी
लुमेवाडी (ता. इंदापूर) येथील पैलवान अलीअहमद मुसा पठाण यांनी पुणे जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला.
ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बापूसाहेब आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, निमगाव केतकी येथे झाली होती.
स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पठाणचे अभिनंदन केले. सध्या तो दगडू दादा बनसोडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, गोतंडी येथे शिकत असून, त्यास वस्ताद अस्लम मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभले. लुमेवाडी येथील ग्रामस्थांनी आली अहमद पठाण याचे स्वागत आहे.



