Home Maharashtra उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा चिमूर यांनी आरो प्लाॅन्ट संबंधाने मौजा महादवाडी वाशियांची...

उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा चिमूर यांनी आरो प्लाॅन्ट संबंधाने मौजा महादवाडी वाशियांची केली दिशाभूल व फसवणूक… — सरपंच भोजराज कामडी करणार त्यांच्या कार्यालयापुढे अत्मदहन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा महादवाडी वाशियांना गढूळ पाण्याच्या पुरवठा नळ योजना द्वारे व्हायचा.गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे मौजा महादवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडलाय.

      यामुळे सरपंच भोजराज कामडी यांनी चिमूर पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून आरो प्लाॅन्ट बसवून देण्यासंबंधाने मागणी केली.या मागणीला अनुसरून आरो प्लाॅन्ट बसवून देण्यासंबंधाने भुमीपुजन सुध्दा संबंधित विभागाने १५ दिवसांपूर्वी केले.

       परंतु आरो प्लाॅन्ट बसवून देण्यासंबंधाने चिमूर पाणीपुरवठा विभागातंर्गत अंदाजपत्रक आराखडा तयार करण्यात आला नव्हता व आरो प्लाॅन्ट बसवून देण्यासंबंधाने प्रशासकीय मान्यता घेण्यात आली नव्हती असे दिसून येते आहे.

      यामुळे महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी हे तहसील कार्यालय चिमूर ते पंचायत समिती चिमूर असा गावकरी नागरिकांसमवेत पैदल मोर्चा दिनांक १ आक्टोंबर २०२५ ला काढणार आहेत व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिमूर कार्यालयाच्या दारात ते अत्मदहन करणार आहेत असे पत्र उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चिमूर यांना सरपंच भोजराज कामडी यांनी दिले आहे.

     जल जीवन मिशन अंतर्गत महादवाडी गावात काम सुरु असताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खराब केल्यामुळे दिनांक 1/9/2025 ला आरो प्लाॅन्टची सुविधा करीत आहे व आरो प्लाॅन्टचे काम सुरु करीत आहे असे स्पष्ट लेखी पत्र उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी दिले होते हे विशेष!.

       याचबरोबर दिनांक 2/9/2025 ला आरो प्लाॅन्ट चे संबंधित अधिकाऱ्यांनी भूमिपूजन केले.परंतु मागील 22 दिवसा पासून अजून पर्यंत एक खडा सुद्धा आरो प्लाॅन्ट बसवून देण्यासंबंधाने खोदला नाही. 

       तसेच कुठल्या योजने मधून आरो लावीत आहेत हे ग्रामपंचायत महादवाडीला अजूनही काडविले नाही.

     याचाच अर्थ संबंधितांनी सरपंच आणि ग्रामपंचायत महादवाडी ग्रामस्थांना फसविले आहे असा आरोप सरपंच भोजराज कामडी यांनी केला आहे. 

      तद्वतच पोलिश स्टेशन मध्ये सर्व गावकरी उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार असेही स्पष्ट केले आहे.

        अर्जाच्या प्रती मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प चंद्रपुर,उपविभागीय दंडाधिकारी किशोर घाडगे,उपविभाग तहसील कार्यालय चिमूर,तहसीलदार श्रिधर राजमाने तहसील कार्यालय चिमुर,गटविकास अधिकारी,पंचायत समिती चिमुर,उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पोलीस स्टेशन चिमूर,ठाणेदार पोलीस स्टेशन चिमुर यांना देण्यात आले आहे.