Home Maharashtra हतरु परिसरातील गावे पंधरा दिवसांपासून अंधारात नागरिक त्रस्त…

हतरु परिसरातील गावे पंधरा दिवसांपासून अंधारात नागरिक त्रस्त…

  अबोदनगो चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

          दखल न्युज भारत

अमरावती :- हतरु व परिसरातील आदिवासी बहुल गावे मागील पंधरा दिवसांपासून अंधारमय असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हतरु गावाची लोकसंख्या सुमारे एक हजारच्या घरात असून, वीजपुरवठा नियमित न झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

       पावसाळा सुरु झाल्यापासून या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे वीज खंडित झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीकडून वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुकानदार आणि रोजंदारी करणारे नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

         हतरु हे परिसरातील एक मोठं गाव असूनदेखील वीजपुरवठ्यातील वारंवार व्यत्यय आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष हे गंभीर बाब आहे आदिवासी भागातील या अंधारमय परिस्थितीकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

        पंधरा दिवसांपासून वीज नाही तरी पण कोणी ऐकत नाही. रात्रीचा अंधार, पावसाळा आणि डासांचे त्रास यामुळे जीवन कष्टदायक झाले आहे असे स्थानिकांनी सांगितले गावकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडून तातडीने दखल घेऊन हतरु व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.