Home Maharashtra वाखरी पालखी तळ,भक्ती सागर,वाळवंट,पत्रा शेडची विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून पाहणी…

वाखरी पालखी तळ,भक्ती सागर,वाळवंट,पत्रा शेडची विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून पाहणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

  पंढरपूर – आषाढी शुध्द एकादशी सोहळा दि. ६ जुलै २०२५ रोजी असून, या आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय नये यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.

           पालखी तळ, भक्तीसागर(65 एकर), चंद्रभागा वाळवंट येथे वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये शौचालय, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच मंदिर समितीकडून पत्रा शेड, दर्शन रांगेत, करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. तसेच नवीन बसस्थानकाजवळ पोलीस प्रशासनाच्या वतीने वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी व गर्दी व्यवस्थापन आदीबातची माहितीसाठी एकात्मिक नियंत्रण प्रणाली च्या ठिकाणची विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी पाहणी करुन आवश्यक सूचना दिल्या.

           यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी प्रशासनाकडून वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर समितीकडून वारकरी-भाविकांना देण्यात आलेल्या सुविधांची व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे जतन संवर्धन आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

       तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपालिका प्रशासनाकडून 65 एकर, वाळवंट व शहरात आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधा, अतिक्रमण मोहिम, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था आदीबाबत माहिती दिली.