शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी मौजा वाहाणगाव अंतर्गत विविध विकास कामांसाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांना निवेदन दिले.
त्यांनी निवेदनात श्री.बाबाराव मेश्राम ते स्मशान पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे,श्री.मनोहर नेउलकर ते श्री.संभाजी मसराम यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रिट बंदिस्त नालिचे बांधकाम करणे, ग्रामपंचायत परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे व परिसरात सौंदर्यीकरण करणे,स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करणे,गावातंर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे,बाबत मागणी केली आहे.
सदर सर्व कामांना १ करोड १५ लाख रुपये खर्च येणार असे त्यांनी नमूद केले आहे.
निवेदन देते वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा पदाधिकारी उपस्थित होते.



