Home Maharashtra मोशीत आजपासून संरक्षण सामग्री प्रदर्शन नौसेना, लष्कर, वायुसेनेचा सहभाग…

मोशीत आजपासून संरक्षण सामग्री प्रदर्शन नौसेना, लष्कर, वायुसेनेचा सहभाग…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : मोशी-प्राधिकरणातील मैदानावर निर्यातक्षम संरक्षण सामग्री प्रदर्शनाचे (महाराष्ट्र एमएसएमइ डिफेन्स एक्स्पो) २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा सहभाग असून, एकूण २० दालने तयार करण्यात आली आहेत. तर खुल्या जागेत हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा असणार आहेत. खासगी उद्याोग, नवउद्यामींची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार आहेत.

          उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. सामंत यांनी शुक्रवारी प्रदर्शनाचा आढावा घेतला. तसेच उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. उद्याोग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पिंपरी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल, महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण या वेळी उपस्थित होते. उद्याोगमंत्री सामंत म्हणाले की, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याोगांचे देशातील सर्वांत मोठे संरक्षण प्रदर्शन महाराष्ट्रात होत आहे. या प्रदर्शनातून अभियांत्रिकी, अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना उपयुक्त माहिती मिळणार आहे.

दालनांना किल्यांची नावे

           प्रदर्शनातील चार दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा अशी नावे देण्यात आली आहेत. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार असल्याचेही उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.