शिक्षा आणि माजी मंत्री सुनील केदार रात्रोला रुग्णालयात दाखल…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका 

           डोके दुखी बरोबरच छातीत दुखत असल्याचा प्रकार घडल्याने सुनील केदार यांना रात्रोला उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

       तीव्र डोकेदुखीमुळे आणि छातीत दुखत असल्या कारणाने त्यांना अस्वस्थ वाटत होते.त्यामुळे सुनील केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

         नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

           आमदार सुनील केदार यांची सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.डॉक्टरांच्या निगराणीत केदार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे तर इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. 

          डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात सुनील केदार यांच्यावर उपचार सुरू आहेत.

             न्यायालयातून नागपूर सेंट्रल जेलला रवाना करण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी सुनील केदार आणि इतर आरोपींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले होते.

          रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास असल्याने तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली.डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार आहे.तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात केदार यांच्यावर उपचार सुरु आहे.

              सुनिल केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता.मात्र,कोर्टाने केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

         नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल लागला.यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

           नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते.ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत.