भिसी येथे जिल्हा ग्रंथालय अधिवेशन.. — वार्षिक अधिवेशन २७ नोव्हेंबरला..

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

भिसी :- येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचणालयाच्या संयुक्त विद्यमाने भिसी येथे वार्षिक ग्रंथालय अधिवेशन २७ नोव्हेंबर होत आहे.

       श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या सभागृहात ग्रथालय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

         या कार्यक्रमाला आमदार किर्तिकुमार भांगडीया,डॉ.गजानन कोटेवार,तहसीलदार प्राजक्ता बुंराडे,भिसी नगरपंचायत मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, रत्नाकर नलावडे,शिवकुमार शर्मा,रत्नरक्षित शेंडे,अनिल बोरगमवार,भाऊराव पन्नी,चंद्रकांत पानसे,भिसी ठाणेदार प्रकाश राऊत,सुभाष शेषकर,मारोती राऊत,वर्षा लोणकर,यांची उपस्थिती राहणार आहे.

         सदर अधिवेशन एकाच दिवशी दोन सत्रात होणार आहे.पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.प्रतिनिधी नोंदणी, चहापान व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

        दुसऱ्या सत्रातंर्गत ग्रंथ संम्मेलनला डॉ गजानन कोटेवार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतिश वारजुरकर,अरविंद रेवतकर,धनराज मुंगले यांची उपस्थिती राहणार आहे.

            सत्राच्या शेवटी मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

          ग्रंथालयाच्या वाढत्या अडचणी व शासनाची भुमीका,इत्यादी अनेक विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

        कार्यक्रमाची सांगता खुले अधिवेशन घेऊन समारोप करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी वार्षिक अधिवेशनाला हजर राहण्याचे आवाहन शामराव रामटेके व समाजसेवक प्रकाश मेश्राम यांनी केले आहे.