ग्रामसभेत का आली म्हणून ४५ वर्षीय महिलेस शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी.. — तिन आरोपीविरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हे दाखल.. — कसबेगव्हान येथील घटना..

युवराज डोंगरे/खल्लार

       उपसंपादक 

          खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कसबेगव्हान येथील ४५ वर्षीय महिलेस ग्रामसभेत का आली म्हणून?गावातीलच तिन युवकांनी अश्लील शिवीगाळ करुन महिलेस लोटलाट करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची गंभीर घटना घडली.

           फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन तिन आरोपीविरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

              कसबेगव्हान येथील ग्राम पंचायतची ग्रामसभा दि.२२ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती.सदर ग्रामसभेत गावातील ४५ वर्षीय फिर्यादी महिला गेली असता त्याच गावातील कुणाल विनोद दामले वय २३,मयूर राजु मोरे वय २०,कुलदीप प्रदिप इंगळे वय २२ या तिन्ही युवकांनी महिलेस तू ग्रामसभेत का आली? म्हणून लोटलाट करुन अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.

        सदर घटनेची तक्रार फिर्यादी महिलेने खल्लार ठाण्यात दिली असून त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुध्द अप.न.२३७/२३ कलम ३५४,३५४(अ),3३२३,५०६,३४ अन्वये गुन्हे दाखल करुन अटक केली.