शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुकातंर्गत येत असलेल्या मौजा सावरी (बिडकर) येथे पारंपरिक पद्धतीने बैल पोळा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण.शेतीची मशागत करण्यासाठी सिंहांचा वाटेकरी म्हणजे पाळीव प्राणी बैल होय.
अशा आपल्या पाळीव प्राणी बैल सहकार्याचा उत्सव म्हणजे पोळा सण मोठ्या थाटात करण्याची परंपरा महाराष्ट्र राज्यांतर्गत विदर्भात आहे.
हा उत्सव चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिडकर) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच लोकनाथ रामटेके यांनी शेतकरी बांधवांना पोळा उत्सवाच्या निमित्ताने मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्यात…



