शाॅक लागुन महावितरण कंत्राटी कामगार श्रावणचा मृत्यू…

 

      कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – खंडाळा येथील बस स्टाॅप जवळील विद्युत खांबाजवळ विद्युत दुरूस्तीचे काम करीत असतांना महावितरण कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगार श्रावण भारसाखरे यांचा मृत्यु झाल्याने संपुर्ण कन्हान परिसरात शोककळा पसरली आहे.

          प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.२२) जुन ला दुपारी ३.३० ते ४ वाजता दरम्यान तारसा रोड खंडाळा बस स्थानकाजवळ महावितरण कंपनीचे लाईनमॅन व काही कर्मचारी विद्युत दुरुस्तीचे काम करित होते. 

      लाईनमॅन खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असल्याचे बोलल्या जात आहे.मृतक श्रावण लक्ष्मण भारसाखरे वय ५० वर्ष रा. पिपरी-कन्हान हा तिथेच खाली उभा होता.एबी स्वीच उचलत असतांना श्रावण भारसाखरे हा अचानक खाली पडुन बेशुध्द झाल्याने सहकाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. 

      मात्र श्रावणने इशा-याने छातीत दुखत असल्याचे म्हटल्याने त्याच्या छातीला हाताने दाबुन पंप करून हात-पायांची मसाज करून कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर कामठीला रेफर केल्याने कामठी रुग्णालयात उपचारा दरम्यान श्रावण भारसाखरे यांचा मृत्यू झाला.

       सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळता च सहा.फौजदार सुर्यभान जळते, महेंद्र जळीतकर,सम्राट वनपर्ती हयांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. 

     या प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी अभियं ता प्रल्हाद बुद्धलाल ओमकार वय ३९ वर्ष रा. हनुमान नगर कन्हान यांचा तक्रारी वरून पोस्टे ला कलम १७४ जा.फौ अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते हे करीत आहे.