गुणवंत लेकीचा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार…

      राकेश चव्हाण 

 कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

           बारावी बोर्ड परिक्षेत श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे शिकणारी आंधळी नवरगाव गावातील विद्यार्थीनी कुमारी प्रणाली भारती भाग्यवान लाडे ही कला शाखेतून ८४.५० % घेवून गडचिरोली जिल्हातून द्वितीय व कुरखेडा तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल गट ग्रामपंचायत आंधळी नवरगावच्या सरपंच उज्वला रायसिडाम, उपसरपंच अप्रव भैसारे यांच्या वतीने प्रणाली व तिचे पालक भारती भाग्यवान लाडे यांचे सुद्धा स्वागत करून सत्कार करण्यात आले.

          सत्कार कार्यक्रम प्रसंगी सरपंच उज्वला रायसिडाम, उपसरपंच अप्रव भैसारे, ग्रामपंचायत सदस्य सिमा सयाम, मिनाक्षी डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष संघमित्रा कराडे, अंगणवाडी सेविका रमावती भैसारे, रंजू सहारे, सामाजिक कार्यकर्ते कुमोद बोदेले, सुमन भोंडे, संगीता बोदेले ,सुजाता कराडे, ममता जांभुळकर, मोबाईलझर पुष्पा किरसाण शिपाई घनश्याम उईके, संतोष सयाम व गावकरी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेविका लता डोंगरवार‌ यांनी केले तर आभार कुमोद बोदेले यांनी मानले.

          यावेळी प्रणाली लाडे हीने आपले मत व्यक्त करताना आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य व शिक्षक वृंद,पालक यांना देत,ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी यांचे आभार मानले. विशेष आपल्या पाल्यांचे सत्कार होतांना तिच्या आईचे खुशीने डोळे पाणावले होते.