Home Maharashtra विहीर बांधकामात अनियमितता,एकाच शेतकऱ्यांच्या नावाने दोन विहिरी मंजूर? — कृषी अधिकारी...

विहीर बांधकामात अनियमितता,एकाच शेतकऱ्यांच्या नावाने दोन विहिरी मंजूर? — कृषी अधिकारी संजय कामडे व एपीओ अजय काकडे यांचेवर कारवाई करावी :- विलास डांगे शिवसेना तालुका प्रमुख चिमुर यांची मागणी….

दिक्षा कऱ्हाडे

  वृत्त संपादिका

       चिमुर तालुक्यात विहीर बांधकामे,विहिर बांधकाम अंदाजपत्रकीय आराखड्याप्रमाणे होत नाही.तसेच शेतकऱ्यांनी कोणत्या योजनेतून विहीर बांधकाम केले,याबाबत अनेक विहिरीवर फलक लावलेले नाही,यामुळे कृषी अधिकारी संजय कामडे व एपिओ संजय काकडे यांच्यावर उचित कारवाई करण्याची मागणी चिमूर तालुका शिवसेना प्रमुख विलास डांगे यांनी केली आहे. 

           त्यांचे म्हणणे आहे की,शासकीय योजनेतून लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी मनरेगा,बिरसा मुंडा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अशा योजनेतून एका लाभार्थीस दोन-दोन विहीरिचा लाभ,अधिकाऱ्याच्या संगणमताने देण्यात आला असल्याचे वाघेडा व म्हसली परिसरातील नागरिकांत चर्चा सुरु असल्यावरुन दिसून येते आहे.

             या दोघांचेही भ्रष्ट्राचार लपविण्यासाठी गटविकास अधिकारी नितीन फुलझले प. स.चिमुर यांचे पाठबळ असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप सुध्दा विलास डांगे यांनी केला आहे.

            तसेच विहिर योजनेचा लाभ घेतलेल्या व विहीर बांधकाम झालेल्या लाभार्थ्यांना किंवा विहीरीचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना,विहीरीचा लाभ न घेतल्याचे संबंधित अधिकाऱ्याचे येनोशी (प्रमाणपत्र ) घेऊन सादर करावे लागते.

             मात्र असे झाल्याचे दिसत नाही.याचबरोबर अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करुन एकाच शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा विहीर लाभ मिळवून देण्यास मदत केली असावी व शासनाच्या रुपयांचे आर्थिक नुकसान केले असावे,या अनुषंगाने विलास डांगे यांना दाट संशय आहे.

              ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा विहिरीचा लाभ घेतला,त्याच शेतकऱ्यांना विहीर योजनांतर्गत दुसऱ्यांदा विहीर मंजूर करुन लाखो रुपयांचा खर्च केला,तो खर्च संबंधित अधिकारी याचेकडून वसूल करावे अशी मागणी सुध्दा विलास डांगे यांनी केली आहे.

           विहीर योजना अंतर्गत दुसऱ्यांदा एकाच शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ देण्याचा प्रकार सतत 

           तीन ते चार वर्षांपासून सुरु असल्याचे विलास डांगे यांचे म्हणणे आहे…‌