शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा माकोना ते गिरोली पांदन रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी दोन्ही गावांतील शेतकरी भर उन्हात धरणे आंदोलन करण्यासाठी बसले आहे.
गेल्या ४० वर्षांपासून माकोना ते गिरोला शेतीच्या रस्त्यासाठी शेतकरी मागणी करत आहे.मात्र मागणी पुर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग काम करण्यास लाबंवत आहे.
पंरतु या ठिकाणी शेतकरी बाधंवाची मागणी आहे की शेतीच्या कामासाठी दिरंगाई होत आहे.त्यामुळे जिव गेला तरी चालेल अश्या विचाराने आत्मदहन आंदोलन उभारण्यात आले आहे.
सदर आंदोलनकर्त्यांनी सांगितले की कामाला सुरुवात झाली तरच आंदोलन मागे घेण्यात येणार,अन्याथा उन्हात जिव गेला तरी चालेल आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याच्या भुमिकेवर ठाम आहेत.
आंदोलनाचे नेतृत्व भिम आर्मी संविधान रक्षक दल चिमुर तालुका कार्याध्यक्ष जगदीश भाऊ मेश्राम करीत असून त्यांचे शेतकरी सहकारी बांधव चंद्रकांत पिपंळकर,विनोद धोटे,पवन बोबडे,लोकेश धोटे,पवन डोईजड,सुरेखा शेंबेकर,लिलाबाई पेद्राम,ज्योती कावळे,पुष्पा कावळे,विठ्ठल पिंपळकर आंदोलनात सहभागी झाले आहेत.



