देलनवाडी येथे दुर्गा मातेची मुर्ती प्राणप्रतिष्ठान आणि अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन…

अनिलकुमार एन.ठवरे

     जिल्हा प्रतिनिधी

      दखल न्युज भारत

देलनवाडी :- सार्वजनिक दुर्गा माता मंदिर बाजार चौक, देलनवाडी येथे दि.२०,२१ व २२ नोव्हेंबर २०२३ असे तीन दिवसीय दुर्गा मातेची मुर्ती प्राणप्रतिष्ठान आणि अभिषेक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन केल्या गेले.

     या निमित्ताने हवन पूजा व भव्य प्रमाणात कलश शोभायात्रा गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली.त्यानंतर मुर्ती प्राणप्रतिष्ठान व अभिषेक पूजन करून गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले. महाप्रसाद वितरीत करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी गावातील समस्त महिला,पुरुष, आबाल-वृध्द व बालगोपाल उपस्थित होते.