Home Maharashtra भिगवण शहरातील रस्त्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर :- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे…

भिगवण शहरातील रस्त्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर :- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे…

 बाळासाहेब सुतार

निरा नरशिंहपुर प्रतिनिधी 

           भिगवण शहरातील आंबेडकर चौक ते बसस्थानक रोडचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी दिली.

           पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बसस्थानकाच्या बांधकामात रुंदीकरण आणि पूर नियोजनाचा समावेश करण्यात आला आहे.

          पोलिस स्टेशन, थोरातनगरसह परिसरात पावसाच्या पाण्यामुळे वारंवार नुकसान होत असल्याचे लक्षात घेता, या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणामुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा सुरू असून, उर्वरित भागांचेही पंचनामे लवकर होतील.

           वाहतूक सोयी वाढतील, तसेच जलसंकट कमी होईल, असे भरणे म्हणाले. ही घोषणा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाच्या शुभारंभानिमित्त ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे करण्यात आली.

           यावेळी सरपंच गुराप्पा पवार, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, मार्केट कमिटी उपसभापती पराग जाधव, नानासाहेब बंडगर, अजिंक्य माडगे, डॉ.चंद्रकांत खाणवरे, अण्णा धवडे, प्रदीप वाकसे, महेश शेंडगे, रोटरी क्लब अध्यक्ष निखिल बोगावत, सीमा काळंगे, अश्विनी शेंडगे, तृप्ती जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत लोखंडे व स्टाफसह राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. भरणे यांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

         महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा सुरू असून, उर्वरित भागांचेही पंचनामे लवकरच पूर्ण होतील. सरकार सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई देणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.