भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दि रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हिंग एन्हान्समेंट, गडचिरोली आणि डॉ. हेडगेवार हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने श्री पांडुरंग बनपूरकर महाविद्यालयाच्या पाटांगणात रोगनिदान शिबीर आणि नि:शुल्क औषध वितरण कार्यक्रम पार पडला.
या शिबिरात बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, क्षयरोग आणि विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच सिकलसेल, थॅलेसिमिया, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, ईसीजी यांची तपासणीही मोफत करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाला आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी भेट दिली व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, तालुका महामंत्री सुभाष धाईत, हेमंत राठी, अंकुश गोडलवार, बनपूरकर, डॉ.मोरेश्वर राठोड, डॉ.अजिंक्य खंबाळकर, डॉ.प्रियांका शेडमाके, डॉ.विवेक हजारे, डॉ. प्रवीण रमेश, डॉ. सुरज मंडळ, डॉ.यश माने, डॉ.पार्थ टेकाळे, डॉ.राहुल धाडसे, डॉ.श्वेता गोडलवार चेतन गणबोईनवार व सहकारी उपस्थित होते.



