Home Maharashtra ना.आशिष शेलार यांनी अखेर उघडं पाडून दाखवलं?… 

ना.आशिष शेलार यांनी अखेर उघडं पाडून दाखवलं?… 

    उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागच्याच आठवड्यात विधानसभेत सांगितलं होतं की जनसुरक्षा कायदा फक्त नक्षलवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांसाठी आहे. 

       तांबडशेत येथे त्यांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री ना.आशिष शेलारांनी मळमळ ओकून टाकत सांगूनच टाकलं की हा कायदा पर्यावरणवादी लोकांवर पण लावला जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी एकाच आठवड्यात खोटं ठरवलं.

         जनसुरक्षा कायद्याचा उद्देशच सांगून टाकला.”कुठे आहे हुकूमशाही’? असा बेशरम प्रश्न विचारणाऱ्यांनी ओंजळभर पाण्यात नाक बुडवून जीव द्यावा असा हा दिवस आहे. 

        नद्यांची,डोंगरांची वाट लावणं हा भाजपाचा हक्क आहे.देशातल्या राखीव वन जमिनी अदानीला देणं आणि अभयारण्य अंबानीला देणं हा भाजपाचा हक्क आहे. 

        देश आणि महाराष्ट्र राज्यातील जल,जमीन,जंगल ही भाजपाची खाजगी जायदाद असून तिचं काय आणि किती वाटोळं करायचं ते भाजपा ठरवील असा ना.आशिष शेलारांचा एकूण आवेश आहे.पर्यावरणासाठी जे जे लढतात ते ते शेलारांच्या दृष्टीनं अर्बन नक्षल आहेत. 

       पुण्यात टेकडी आणि नदी वाचवण्यासाठी काम करत असल्याचं दाखवणार्‍या मनातून भाजपा हितसंवर्धक असलेल्या पर्यावरणवादी मंडळींनी सावध होण्याची गरज आहे.उद्या नदी वाचवण्यासाठी तुम्ही रॅली काढली तर तुम्ही अर्बन नक्षल म्हणून तुरुंगात जाऊ शकताय.