हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात,महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचेसाठी रविवारी घेतल्या 5 सभा!.. — सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद व मोठी गर्दी!… — आज सोमवारी 5 सभांचे आयोजन… 

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

             भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री यांचा हर्षवर्धन पाटील यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचेसाठी प्रचाराचा झंझावात सुरु आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात रविवारी (दि.21) वडापुरी, शिरसोडी, बिजवडी, पळसदेव, भिगवण येथे सभा घेऊन अबकी बार 400 पार साठी सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान,आज सोमवारी (दि.22) हर्षवर्धन पाटील यांच्या शेटफळगढे (सकाळी 8.30 वा.), लाकडी (मारुती मंदिर – दुपारी 11.30), सणसर ( 4.30 वा.), लासुर्णे ( सायंकाळी 6.30 वा.) , शेळगाव ( रात्री 7.30 वा.) या प्रमाणे प्रचाराच्या सभा होणार आहेत.

              हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भाजपच्या वतीने सभांचा शुभारंभ शनिवारी (दि.20) करण्यात आला. शनिवारी हर्षवर्धन पाटील यांच्या सहा ठिकाणी मोठ्या सभा झाल्या.

             तर रविवारी (दि.21) हर्षवर्धन पाटील यांच्या सभांना पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार, भाजपचे गावोगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

          रविवारी झालेल्या वडापुरी, शिरसोडी, बिजवडी, पळसदेव, भिगवण येथील सभांमध्ये बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व हे विश्वव्यापी असे नेतृत्व आहे. अशा या नेतृत्वाचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. शेतकरी, कामगार, मागासवर्गीय, युवक, महिला आदि सर्वांसाठी केंद्र सरकारने विविध योजना यशस्वी राबविल्या आहेत. सर्वांना मोफत धान्य ही योजना तर ऐतिहासिक अशी आहे. आगामी काळातही समाजातील सर्व घटकांच्या विकासाची गॅरंटी भाजप नेतृत्वाखालील एनडीए ने घेतली आहे.

           पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. देशातील मतदारांबरोबर इंदापूर तालुक्यातील मतदारही मोदींबरोबर आहे. केंद्र व राज्य पातळीवरील भाजप नेतृत्वाचे बारामती मतदारसंघावर लक्ष आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने व जबाबदारीने काम करून उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठे मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन केले. भाजप कार्यकर्त्यांनी आपले बुथवरील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियोजन करावे. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 गटांमध्ये तसेच इंदापूर शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व आपल्या संयुक्त प्रचारसभा होणार असल्याची माहितीही भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. हर्षवर्धन पाटील यांनी प्रचार सभांचा झंजावात सुरू केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणे संदर्भात असलेला संभ्रम दूर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

चौकट

विकासाचे नवीन पर्व सुरु होणार – हर्षवर्धन पाटील

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी दि. 21 विविध सभांमध्ये बोलताना सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने इंदापूर तालुक्यामध्ये विकासाचे नवीन पर्व सुरू करायचे आहे. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना तसेच तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न मार्गी लावणेसाठी केंद्राचा निधी मिळवायचा आहे. केंद्र व राज्यातील भाजपचे नेतृत्व इंदापूर तालुक्याच्या पाठीशी आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना भरघोस मतदान करावे, असे आवाहन भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.