अवैद्य रेतीचे तीन ट्रॅक्टर जप्त…. — सावली पोलिसांची कारवाई…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

  सावली तालुक्यातील उसेगाव वैनगंगा नदी घाटावर अवैध्य रेतीची वाहतूक अनेक दिवसापासून सुरू होती.परंतु संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत होते.

         जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संपूर्ण जिल्ह्यामध्ये वैयक्तिकरीत्या अवैध्य रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती माफियाच्या विरोधात कारवाई करण्याचा धडाका सुरू केला. त्यात आज दिनांक २२ मार्चला सकाळी नऊच्या सुमारास सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गस्त टाकली असता तीन रेतीने भरलेली ट्रॅक्टर आढळून आले.

            त्यात एमएच३४ एपी ०१२७ सुनील केशव बोमनवार राहणार सावली (मालक) ईश्वर जांभुळे (चालक)एमएच ३४ एम ५६ ७२ सतीश मोरेश्वर कोतपल्लीवार मालक दिलीप राऊत (चालक) एमएच ३४ बीआर ३९३२ सुजित भगवान दंडावर राहणार खेडी (मालक) नितीन गेडाम (चालक) संबंधित चालक-मालक यांचेवर आयपीसी 379 अंतर्गत गौण खनिजाची रेती चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला,त्यात त्यांच्याकडून एकूण 16 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

           सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांचे नेतृत्वात पीएसआय सचिन मुसळे हवालदार संजय शुक्ला,चंद्रशेखर विदुरकर द्वारे करण्यात आली.