सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवूनच आपले कार्य :- एस. भगत… — उपविभागीय पोलीस अधिकारी व राज्य पत्रकार संघ दिलखुलास चर्चा…

प्रदिप रामटेके 

मुख्य संपादक 

            नुकतेच अमरावती जिल्ह्यातून बदली वर आलेले मूल उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस.एस.भगत यांची राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी संघाचे मूल तालुका अध्यक्ष सतिष राजूरवार,राजेंद्र सुत्रपवार सोबत होते.

         ३१ वर्षातील आपल्या पोलीस विभागातील यशस्वी कारकिर्दीचा अनुभव सोबतीला घेऊन व सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेऊन मूल उपविभागात काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    यावेळी इतरही अवांतर विषयावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुक अतिशय पारदर्शकतेने पार पाडण्याकडे त्यांचे पूर्ण लक्ष असल्याचे व उपविभागातील पोलीस यंत्रणा आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात कसर ठेवणार नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून जाणवले.

           यावेळी विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे व उपविभागीय पोलीस अधिकारी एस.एस.भगत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनअपेक्षा,जनभावना, विकास आलेख,यावर दिलखुलास चर्चा केली.

           प्रा.महेश पानसे यांनी राज्य पत्रकार संघाचे कार्य व व्याप्ती या संबधाने माहिती दिली व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. मूल तालुका संघातर्फे अध्यक्ष सतिष राजूरवार यांनी शुभकामना दिल्यात.