शहर काँग्रेस कमिटी कडुन सदभावना दिवस साजरा.

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

    भारतरत्न युवकांनचे प्रेरणा स्थान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस साकोली शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रम शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलिप मासुरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधि दामूजी नेवारे , तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. छायाताई पटले, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. पुष्पाताई कापगते यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन झाला.

        प्रदेश प्रतिनिधि दामू नेवारे यांनी आपल्या मार्ग दर्शणीय भाषणात राजीव गांधी यांनी अठरा वर्षांच्या युवकांना मतदानाचा अधिकार देवून लोकशाहीच्या मुख्ये प्रवाहात जोडण्याचे काम केले त्या मुळे देशातल्या प्रतेक निर्णयात व विकासात युवकांचा सिंहाचा वाटा राहतो. देशातील तरुणांच्या हातात मोबाइल व कांपूटर च्या बटना देवून भारत देशात मोठी औदोगिक विकासाची क्रांति राजीव गांधी यांनी घडवून आणल्याचे त्यानी आपल्या भाषणात सांगितले.

 अध्यक्ष भाषणात स्व. राजीवजी गांधी यांचे बलिदान देश कधी ही विसरु शकत नाही, आज जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे नाव आदराने घेतल्या जाते ते राजीव गांधी यांनी केलेल्या औदोगिक क्रांति मुळे व काँग्रेस च्या सर्व धर्म समभाव मुले असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमात प्रतिमेचे पुजण छायाताई पटले यांनी केले. कार्यक्रमात शहर काँग्रेस महासचिव विजय साखरे, उपाध्यक्ष दिलिप निनावे, शहर सचिव आकाश मेश्राम, सतिश रंगारी कृष्णा हुकरे, प्रकाश करंजेकर, विशाल गजभीये, शालू न्ंदेश्वर, चंद्रकांत सोनवणे, अनिल भैसारे, सोनू बैरागी, दर्यावर डोंगरे सर, सुनिल सिडाम, रविंद्र पंचाभाई व बहू संख्ये कांग्रेश कार्यकते उपस्थीति होते.

  कार्यक्रमाचे संचालन भाष्कर खडीकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. नेहा रंगारी यांनी केले.