शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मौजा शंकरपुर येथील,कांपा चिमूर रोडच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम न केल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून आर्थिक नुकसान झाले असल्याचे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर यांना दिलेल्या निवेदनात उपसरपंच अशोक चौधरी यांनी लक्षात आणून दिले आहे.
मौजा शंकरपूर येथील कांपा चिमूर रोडचे नवीन बांधकामाची उंची वाढल्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूला नाली चे बांधकाम करण्यात आले नाही.त्यामुळे पाऊसाचे पाणी व घरगुती सांडपाणी साचल्यामुळे लोकांच्या घरात सदर पाणी जात असून घरगुती उपयोगाच्या सामानाचे व शेतमालाचे नुकसान झाले असल्याचे निवेदनात नमूद आहे.
साचलेल्या पाण्यामुळे मोठे मोठे खड्डे पडल्याने जनावर त्या पाण्यामध्ये बसत असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे साथीच्या रोगाची लागण सुरु झालेली आहे.
या साचलेल्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यास काही कमीं जास्त झाल्यास आपण स्वताः जबाबदार राहणार असे सुध्दा निवेदनातून स्पष्ट केले आहे.
आवश्यक समस्यांची सखोल चौकशी करून सांडपाण्याचा व पाण्याचा निचरा करण्यासंबंधाने काय उपाय योजना करता येईल ते लवकरात लवकर उचित कारवाही करून कार्यवाही करावे व तसी माहिती निवेदनकर्त्यास सादर करावे अशी विनंती उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.
निवेदनाच्या प्रति सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले,चंद्रपूर जिल्हा पालक मंत्री अशोक उईके, चंद्रपूर जिल्हाधिकारी,कार्यकारी अभियंता नागभिड,जिल्हा शल्यचिकित्सक सार्वजनिक आरोग्य विभाग चंद्रपूर यांना देण्यात आली आहेत.



