साखळी उपोषण स्थळी डॉ.सतिष वारजूकरांची पक्ष पदाधिकाऱ्यांसह भेट… — राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर अंतर्गत आर्थिक भानगड.. — जिल्हाधिकारी लक्ष देतील काय?

 दामोधर रामटेके

  कार्यकारी संपादक

          राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झाले असल्यामुळे खातेदारांचे व सभासदांचे जमा रुपये पतसंस्थेकडे अडले आहेत.

       जमा रुपये मिळावे यासाठी अन्याय निवारण समितीचे सदस्य मागिल काही दिवसांपासून चिमूर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करीत आहेत.

          या साखळी उपोषण स्थळाला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काॅग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ.सतिष वारजूकर,काँग्रेस पक्ष चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,अँड.धनराज वंजारी,श्री.चौधरी व इतर काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी आज भेट दिली व साखळी उपोषण कर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

          चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन व ७ वेळा स्मरणपत्र दिल्यानंतर सुध्दा खातेदार व सभासद यांचे पतसंस्थेकडे जमा असलेले रुपये देण्यासंबंधाने कायदेशीर हालचाली करण्यासाठी ते कारवाई करीत नसल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी व अन्याय निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी केला आहे.

          निवेदनात आरोपींची मालमत्ता लिलाव करून खातेदारांचे व सभासदांचे रुपये देण्यासंबंधाने मागणी केली आहे.