Home Social लिंबुनीवन वडाळा (पैकू) येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ व सावित्रीमाई फुले संयुक्त जयंती...

लिंबुनीवन वडाळा (पैकू) येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ व सावित्रीमाई फुले संयुक्त जयंती संपन्न…

      रामदास ठुसे

नागपुर विभागीय प्रतिनिधी 

       चिमूर येथील कांतिज्योती सावित्री माई फुले महिला जागृती विचार मंचच्या वतिने लुंबिनी बौद्ध विहार परिसर ताकसांडे लेआउट वडाळा येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ – सावित्रीमाई फुले व फातीमा शेख यांची संयुक्त जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

       जागृती विचार महिला मंडळा द्वारे गेल्या 20 वर्षा पासुन सदर जंयती समाहोराचे आयोजन सुरू आहे.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताबाई मेश्राम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ताई मेश्राम,विजया थुल,बेबीताई गजभिये,नंदिनी ताकसांडे,विद्या गणविर,ज्योसना सिंगनजूळे या आवर्जून उपस्थित होत्या .

         प्रमुख मार्गदर्शकांनी आपल्या विचारांमध्ये संस्कार,शिल,आचरण,प्रयत्न + ध्येय निच्चीत करून सफलता मिळवावी,मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देवून सामाजिक एकोपा निर्माण व्हावा,आपले संगठन मजबुत करून प्रतिनिधी निवडून पाठवावे या कडे भर दिला.

      सदर कार्यक्रमाचे संचालन शारदा गेडाम व प्रास्तविक ज्योती हुमने यांनी केले.आभार मनिषा गायकवाड यांनी मानले.

       या कार्यक्रमा करिता कामीनी मेश्राम,सरिता राऊत,अनिता गेडाम,कुंदा कोसे, पौणिमा बोरकर,ज्योती तेलतुंबळे,दुर्गा शंभरकर यांनी सहकार्य केले .