मेजर गेट समोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांना धमकावणे केले… — राजू झोडे यांचा आरोप… — दुर्गापुर पोलिसात तक्रार दाखल…

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

                   मागील आठ दिवसांपासून वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी कुणाल कंपणीविरोधात आंदोलन सुरू केले असून सहा दिवस साखळी उपोषण केल्यानंतर दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीने अजूनही कामगारांच्या मागण्या मान्य न केल्याने कामगार उपोषणावर ठाम आहेत. अशातच कुणाल कंपनीचे अधिकारी व वीज केंद्रातील अधिकारी उपोषणावर बसलेल्या कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून त्यांना रात्री बेरात्री दारू पिऊन धिंगाणा घालून धमकावणे सुरू केल्याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिली आहे. तरच वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत केले असून कामगारांना काढून टाकण्याची धमकी सुद्धा दिली जात असल्याचा आरोप झोडे यांनी केला आहे. याप्रकरणी दुर्गापुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही कुठलीही कारवाई न केल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.

          कुणाल कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करत आहेत. मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही, कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते. याविरोधात मेजर गेट समोर हे साखळी उपोषण सुरू होते. मात्र त्यांच्या साखळी उपोषणकडे दुर्लक्ष केल्याने सोमवार पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अशातच कुणाल कंपनीचे अधिकारी व वीज केंद्रातील अधिकारी उपोषणावर बसलेल्या कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून त्यांना रात्री बेरात्री दारू पिऊन धिंगाणा घालून धमकावणे सुरू केल्याची माहिती उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिली आहे. याप्रकरणी दुर्गापुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र दुर्गापुर पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसुन आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. या वेळी उलगुलान संगठनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे, रवि पवार अन्नत्याग आंदोलक पंढरी टोंगे, आंनद पुणेकर, राहुल तुराणकर, अभय सपाट, आशीष ठेगणे सोबत उलगुलान कामगार आंदोलक मंगेश बदकल, कुणाल सुमित, सुमित भिमटे, अक्षय राउत, सुधीर डाहाकी, अक्षय काकडे, राहुल वाभले, राजु जागने, प्रफुल्ल पाटिल आदि कामगार आंदोलक उपस्थित होते.