Home Maharashtra कायद्याच्या चौकटीत राहुनच सण,उत्सव साजरे करा – अतिरिक्त पोलिस अधिक्षक गोकुलदास जी...

कायद्याच्या चौकटीत राहुनच सण,उत्सव साजरे करा – अतिरिक्त पोलिस अधिक्षक गोकुलदास जी यांचे आवाहन…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

देसाईगंज :- देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा हा येत्या दोन दिवसात तर त्याचे पाठोपाठ महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव गणेश चतुर्थी व ईद मिलाद उन्नबी हे सण येत आहेत, संवैधानिक तरतुदी नुसार देशातिल प्रत्येक नागरिकाला आपल्या धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे.

      मात्र तो कायद्याच्या चौकटीत राहुनच साजरा करावा, असे आवाहन गडचिरोली पोलिस दलाचे अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास यांनी देसाईगंज पोलिस स्टेशन च्या वतिने आयोजित शांतता व सुव्यवस्था बैठकिच्या माध्यमातुन केले.                                             

        देसाईगंज पोलिस स्टेशन च्या वतिने आज दि. 20 ऑगष्टला स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवनात देसाईगंज तालुक्यातील सर्व गणेश मंडळ, पोलिस पाटिल व इतर समाज बांधवांची शांतता व सुव्यवस्था बैठकिचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी गडचिरोली पोलिस दलाचे अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास, कुरखेडा कैम्प चे उपविभागिय पोलिस उपअधिक्षक रविन्द्र भोसले, देसाईगंज चे पोलिस निरिक्षक अजय जगताप, सहा. पो. नि. मनिष गोडबोले, दांडेकर उप.निरिक्षक, उदयभान जांभुळकर यांचेसह देसाईगंज पोलिस कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

     उपस्थित सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य पोलिस पाटिल व इतर नागरिकांना बैलपोळा, गणेशउत्सव व ईद मिलाद उन्नबी या उत्सवा संबंधी मार्गदर्शन करतांना अ. पो. अधिक्षक गोकुळदास म्हणाले की, भारतिय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना त्याच्या धार्मिक मान्यतेनुसार सण उत्सव साजरा करण्याचा संवैधानिक अधिकार दिला असला तरी देशातील काही असामाजिक तत्वांकडुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या कालावधित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       येत्या दोन दिवसात देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा महत्वाचा सण पोळा त्या पाठोपाठ गणेश चतुर्थी व इद मिलाद उन्नबी हे सण येत असुन देसाईगंज तालुक्यात एकुण ६२ गणेश मंडळे, शहरात १८ गणेश मंडळे उत्सव साजरा करतात.

      त्या पाठोपाठ १५ गावांत एकगाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते ही अतिशय गौरवाची बाब असुन घटस्थापने पासुन ते विसर्जन पर्यंत सर्व गणेश मंडळांना जाहिराती फ्लैक्ष लावणे, ध्वणिक्षेपणाचा आवाजाची मर्यादा, विद्युत कनेक्शन पुरवठा संबधी तसेच डिजे व परंपरागत वाद्य या सबंधाने इथंभूत माहिती पोलिस प्रशासनाच्या वतिने देण्यात येणार आहे, तसेच ईद मिलाद उन्नबी च्या रैली संबंधाने मार्गक्रमणाची माहिती ही प्रदान करण्यात येणार आहे, हिंदु व मुस्लिम अश्या समाजाचे सण एकाच वेळेत येत असल्याने सर्व धर्मिय बांधवांनी धार्मिक सौहार्द टिकवुन ठेवण्यासाठी कायदेशिर रित्या दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सण उत्सव साजरा करावा असे, आवाहन या प्रसंगी केले.