भारतीय संविधानाने माणसाचा धर्म नाकारलेला नाही. ज्यांना कुणाला धर्माची आवश्यकता वाटत असेल तर त्यांनी आपला पारंपारिक सनातनी धर्म अवश्य बाळगण्याचा पाळण्याचा हक्क आणि अधिकार म्हणजे स्वातंत्र्य प्रत्येकास दिलेले आहे. परंतु माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे त्याला समाजाची गरज आहे आणि त्याला देशाची पण गरज आहे, म्हणून त्याला देशात आणि देशातील सर्व जाती धर्मातील लोकांसोबत राहणे आवश्यक ठरते. स्वतःचा व्यवहार चालविण्यासाठी किंवा प्रगतीसाठी समाजाची आणि देशाची गरज पडते. ही गरज लक्षात घेऊन माणसाने स्वतःचा पारंपारिक धर्म अवश्य पाळावा परंतु त्याचबरोबर सार्वजनिक धर्म म्हणजे देशाचा धर्म म्हणजेच राष्ट्रधर्म पण पाळला पाहिजे. हे विसरता कामा नये. याचा अर्थ माणसाला खाजगी जीवन आहे आणि सामाजिक जीवन आहे आणि त्यासाठी खाजगी धर्म आणि सामाजिक धर्म म्हणजेच सार्वजनिक धर्म म्हणजेच राष्ट्रधर्म असे दोन धर्म आहेत आणि ते पाळले पाहिजे, असे आपले संविधान सांगते. याबरोबरच ज्यांना कुणाला धर्माचे महत्त्व वाटत नाही त्यांना धर्म न पाळण्याचा पण अधिकार देते, याचा अर्थ ” धर्म स्वातंत्र्य” होय.
स्वतःचा धर्म म्हणजे खाजगी धर्म म्हणजेच पारंपारिक धर्म तो प्रत्येकाने आपल्या घरातच पाळायच्या असतो आणि जेव्हा आपण उंबरठा ओलांडतो आणि रस्त्यावर येतो तेव्हा आपल्या सार्वजनिक धर्माची सुरुवात होते, याचे भान प्रत्येकाने ठेवले तर धार्मिक संघर्ष होणार नाहीत आणि बंधुभाव आणि देशप्रेम देशनिष्ठा देशाची एकता देशाची अखंडता कायम राहील.
खाजगी धर्म आणि राष्ट्रधर्म असे धर्माचे दोन प्रकार आहेत आणि हे दोन्ही प्रकारचे धर्म प्रत्येक भारतीय नागरिकांनी पाळले पाहिजेत. पारंपारिक धर्म म्हणजे स्वतःचा धर्म खाजगी धर्म आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे सार्वजनिक धर्म म्हणजेच राष्ट्रधर्म होय. म्हणून धर्म आणि धर्मनिरपेक्षता हे वेगळे नसून एकाच नाण्याचे दोन भाग आहेत म्हणजेच एकाच मनुष्याचे म्हणजेच एकाच देशाचे हे दोन्ही धर्म होऊ शकतात. पण कोणता धर्म कुठे पाळायचा याबद्दलचे स्पष्ट मार्गदर्शन भारतीय संविधानाने केलेले आहे. पारंपरिक खाजगी धर्म हा प्रत्येकाने आपापल्या घरात पाळायचा असतो आणि धर्मनिरपेक्षता हा सार्वजनिक धर्म राष्ट्रासाठी समाजासाठी त्यांच्या एकतेसाठी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पाळायच्या असतो.
याचा अर्थ आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपण आपली जात आणि आपला धर्म विसरूनच घराच्या बाहेर पडायचे असते. आणि आपला दुसरा धर्म तो म्हणजे धर्मनिरपेक्षता हे तत्व आपण सार्वजनिक ठिकाणी पाळले पाहिजे. याचा अर्थ सार्वजनिक ठिकाणी आपण वेगवेगळे नसून सगळे एकच आहोत एकाच देशाचे संतान आहोत म्हणून आपण सारे भाऊ भाऊ आहोत, हे विसरता कामा नये. भारत माता ही आपली आई आहे आणि आपण सारे जण तिचे संतान आहोत. आपण कोणीही कुण्याही जातीचे धर्माचे असलो तरी शेवटी भारत मातेचे मुलेच आहोत, याचे भान नसेल तर जातीचे आणि धर्माचे पाडणे होतच राहणार आहेत. आणि खून खराबा मनुष्य संहार होतच राहणार आहे. सो हिंदू सो मुसलमान जिसका दुरुस्त रहे इमान, जो न होगा कभी देश को बेईमान, तभी बनेगा अपना भारत महान.”एक भारत, श्रेष्ठ भारत” केवळ घोषणा देऊन होणार नाही, तर त्यासाठी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व पालन करणे आणि ते अमलात आणले तरच एक भारत श्रेष्ठ भारत शक्य आहे अन्यथा भारताचे जाती आणि धर्मानुसार तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. बंधुता आणि विविधतेत एकता हे सनातन भारताची , प्राचीन भारतीय संस्कृती आहे, ती जोपासण्याची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु हल्ले सणातेनी धर्म या नावाने एकसंघ भारतीय समाजाचे अनेक धर्मात आणि अनेक जातीत कायमचे विभाजन कसे राहील याचे प्रयत्न होताना दिसत आहे, हे धोक्याची घंटा आहे, म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य ठरते की, भारतीय संविधानाने दिलेला धर्म स्वातंत्र्याचा हक्क याचा गैरवापर न करता, आपला पारंपारिक धर्म आणि सार्वजनिक धर्म म्हणजे राष्ट्रीय धर्म असे आपले दोन धर्म आहेत असे बुद्धीला पटवून घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार खाजगी धर्म केवळ घरातच पाळायचा आणि सार्वजनिक धर्म म्हणजेच राष्ट्रधर्म हा घराच्या बाहेर पळायचा त्याचे भान नागरिक या नात्याने आपण ठेवले पाहिजे.
याचबरोबर” संविधानाने दिलेला धर्माचे स्वतंत्र्य” म्हणजेच धर्म पाळायचा की नाही स्वीकारायचा की सोडायचा, आपला धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारायचा, आस्तिक बनून राहायचे की नास्तिक बनू बनून, याचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले असल्यामुळे, अस्तिक नास्तिक हा भेदभाव न पाळता, कुणी कुणी आस्तिक असा की कोणी नसते कसा परंतु सर्वजण वास्तविक असा म्हणजेच बंधुभाव, विविधतेत एकता, सामाजिक ऐक्य, राखण्यासाठी आपण आपला दुसरा धर्म म्हणजे राष्ट्रीय धर्म म्हणजे सार्वजनिक धर्म पण पाळला पाहिजे, हेच आपल्या आणि आपल्या पुढील पिढीसाठी हिताचे ठरणार आहे.



