सोनमाळा येथे समता सैनिक दलाची स्थापना!…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली -जोशाबा बुद्ध विहार सोनमाळा येथे आज दिनांक 17.06.2023 शनिवार ला समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. दादासाहेब कोचे सर, राष्ट्रीय स्टॉप आफिसर प्रा. गजेंद्र गजभिये सर, उप जिल्हा प्रमुख आयु. आर. सी. फुल्लूके सर, आयु. सी. डी. गवरे सर, गावच्या सरपंच देशपांडे मॅडम तथा गावकरी मंडळी उपस्थित होते.

       सर्व प्रथम सोनमाळा गावामधून पथसंचालन झाले. अग्रभागी झंडा पथक, बँड पथक, अधिकारी गण, तथा समता सैनिक दलाचे सर्व सैनिक, गावकरी मंडळी शिस्तबद्ध रीतीने पथसंचालन पार पडले.

     पथसंचालना नंतर स. सै. द. ध्वजाचे ध्वजारोहण झाले. या प्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. दादासाहेब कोचे सर, राष्ट्रीय स्टॉप आफिसर प्रा. गजेंद्र गजभिये सर, उप जिल्हा प्रमुख आयु. आर. सी. फुल्लूके सर, आयु. सी. डी. गवरे सर, प्रामुख्याने उपस्थित होते.

       या प्रसंगी मार्गदर्शन करतांना आयु. आर. सी. फुल्लूके सरांनी पंचशीलाचे पालन करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तर सी. डी. गवरे सरांनी समता सैनिक दलाचे उद्दिष्ट काय? याचे स्पष्टीकरण केले.

       कार्यक्रमाचे उदघाटक आयु. दादासाहेब कोचे सर यांनी बुद्ध धम्माचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या धम्माची जपणूक केली पाहिजे. तसेच शिलाचे पालन केले पाहिजे. असे सांगितले.

         शेवटी कार्यक्रमचे अद्यक्ष आयु. प्रा. गजेंद्र गजभिये सरांनी अद्यक्षीय भाषनातून सांगितले कि, समता सैनिक दल म्हणजे काय, हे माहित असले पाहिजे, उद्दिष्ठ काय, कोण सैनिक होऊ शकतो? हे संघठण कसे चालते स्वयंसेवी संस्था आहे. हे सर्व समजून घ्या. आपला संसार सांभाळून हे कार्य करा. हे रोपटं लावले याचे वटवृक्ष करणे आपल्या हातात आहे. विचार करा आणि या कार्यास आपले योगदान दया.

       कार्यक्रम समाप्त बनविण्यासाठी आयु.महेंद्र भैसारे मिरेगाव, आयु. आय. एस. चिमणकर साकोली, आशीर्वाद रामटेके, रमेश रामटेके, आसाराम गणवीर तसेच सरपंच देशपांडे मॅडम, देवकन्या कन्हेकर आदी मान्यवर उपास्थित होते.

       कार्येक्रमाचे संचालन आयु. प्रशांत चिमणकर यांनी पार पाडले. शेवटी कार्यक्रमाचे समापन गाथेने करण्यात आले.