अजित 155 या जातीच्या बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यां कृषी केंद्राचा परवाना कायमचा रद्द करा… — दर्यापूर मधील कृषी केंद्राच्या स्टॉक रजिस्टर व गोडाऊनची तपासणी करा.:-आतीष शिरभाते

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून केवळ पावसाची वाट सुरू आहे तर दर्यापूर तालुक्यातील सदन कास्तकार यांनी बियाण्यांचं नियोजन करून कृषी केंद्रा मध्ये बियाणे आरक्षित केले आहेत तर उर्वरित शेतकऱ्यांना अजित 155 या जातीच्या बियाण्यांसाठी चपला घासाव्या लागत आहेत अजित 155 या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे तर दर्यापूर मधील काही कृषी केंद्रातून वाजवीपेक्षा अधिक दराने पावती न देता बियाण्यांची विक्री केली जात असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले तर दर्यापूर मध्ये अजित 155 या जातीच्या वाणाचा काळाबाजार सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे याविषयी अद्यापही राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी यांनी आपली चुप्पी साधली आहे केवळ मताची भीक मागण्यासाठी राजकीय पुढारी हे शेतकऱ्यांच्या दारात मताची भिक्षा मागण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उभे असतात आता मात्र एकही शेतकरी नेता या अजित 155 जातीच्या काळाबाजारा विषयी बोलताना व अधिकाऱ्यांना वेठीस धरतांना दिसून आला नाही आज दर्यापूर मधील समाजसेवक विकी पाटील होले व त्याच्या सहकाऱ्यांनी पंचायत समिती मधील कृषी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले तर आता दर्यापूर मधील ज्या कृषी केंद्रात स्टॉक उपलब्ध आहे मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी मागेपुढे करत आहेत व वाजवीपेक्षा अधिक दरात बियाण्यांची विक्री करत आहेत अशा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्याची मागणी समाजसेवक आतिष शिरभाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.