Home देशविदेश माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अंकुश कडूंच्या भर रस्त्यावरील खुनाने नागपूरची अति गुन्हेगारीकडे...

माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अंकुश कडूंच्या भर रस्त्यावरील खुनाने नागपूरची अति गुन्हेगारीकडे वाटचाल?… — इतिहासिक शहराला गुन्हेगार शहर कोण बनवून पाहतो आहे?

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

        महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आणि भारताचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महत्त्वपूर्ण नागपूर शहरामध्ये दररोज काही ना काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत असतात.परंतू याच नागपूर शहरात वारंवार खून करणाऱ्या घटना घडतात,या घटनांना काय म्हणावे?

        सामाजिक असुरक्षितताचे गंभीर पाऊल की नागपूरकरांना योग्य प्रकारे जगू न देणारी कायमस्वरूपी व्यवस्था!

         माजी शिवसेना उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची नारी रोड,वाडा चौक अंतर्गत भररस्त्यात झालेली हत्या बघता नागपूर शहर गुन्हेगारीच्या बाबतीत बिनधास्त आहे,असेच म्हणावे लागेल.

          इतर गंभीर घटना सह खून करणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीला नागपूर शहरात चालना देण्यासाठी कोण सहकार्य करतात?कोण त्यांचे संगोपन करतात?याचा छडा मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी लावायला हवा अशी अपेक्षा नागपूरकरांची आहे.

        परंतु महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यास यशस्वी होणार काय?हा प्रश्न अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे.आणि तितकाच अविश्वसनीय आहे..

        नागपूर हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शहर,तद्वतच केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींचे शहर! याचबरोबर २ काँग्रेस पक्षाच्या आमदारांसह भाजपाच्या ४ आमदारांचे शहर!परत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे याचे पालकत्व शहर!..

          राजकीय शक्तीसह सत्तेची शक्ती असताना नागपूर शहरात बिनधास्त होणारे खून चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे.

       अशा गंभीर घटनांमुळे जगप्रसिद्ध इतिहासिक नागपूर शहराचे नाव जगात बदनाम होते आहे,याचे भान सत्तापक्षांना सातत्याने असणे आवश्यक आहे.

        नागपूर म्हणजे बौद्ध धम्म रुपी पवित्र दिक्षा भुमिचे जगप्रसिद्ध इतिहासिक शहर!या शहरात,”जगमान्य प्रकांड पंडित-युगपुरुष-भारतीय संविधान निर्माता- भारत देशातील तमाम नागरिकांचे रक्षणकर्ता तथा उध्दारकर्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोंबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन या नागपूर शहराला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वैचारिक आणि नैतिकता अंतर्गत चारित्र्यसंपन्न दृष्टिकोनातून जगात मानसन्मान मिळवून दिलाय.

       याच जगप्रसिद्ध तत्वज्ञानी शहरात वारंवार खून व्हावे हा राजकीय सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा कळस ठरु नये,याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष केंद्रित करणार काय?हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल…