Home Vidarbha धानोरा तालुक्यात १२० अंगणवाडी व मदतनीस पदासाठी 750 अर्ज…

धानोरा तालुक्यात १२० अंगणवाडी व मदतनीस पदासाठी 750 अर्ज…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

धानोरा तालुक्यात 289 अंगणवाडी असून १२० अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी जाहिरात निघाली असून 750 उमेदवारांनी अर्ज केले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास असून शैक्षणिक कागदपत्रानुसार गुणांकन करण्यात येईल अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारानी सुद्धा अर्ज केले आहे.

        सध्या अंगणवाडी व मदतनीस यासाठी सुद्धा उच्च शिक्षण धारक उमेदवारांनी केलेले आहे उमेदवार नोकरीच्या शोधात असताना कोणतीही नोकरी मिळाली ती नोकरी करण्यास आज तयार आहे हे यावरून दिसून येते या पदासाठी कोणतीही परीक्षा नसल्याने थेट निवड होणार आहे.

        सदर प्रक्रियेमध्ये शैक्षणिक कागदपत्रानुसारच गुणदान करण्यात येणार आहे गुणांनुक्रमानुसार उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही.  उमेदवाराची पहिली यादी 12 मार्चला ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात आलेली आहे.  त्यावर कोणाचे आक्षेप असेल तर त्याचे निराकरण झाल्यानंतरच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 उमेदवाराने कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.

       अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी बळी पडू नये यातून उमेदवाराची आर्थिक फसवणूक होऊ शकते यासाठी उमेदवारांनी सतर्क रहावे कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. 

कोट 

          शासन निर्णय यातील अटी व शर्तीनुसारच अंतिम गुणवत्ता यादीतील गुणानुक्रमे गुन्हा अनुक्रमे प्राप्त उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

 नीलिमा गेडाम बालविकास प्रकल्प अधिकारी धानोरा