स्वच्छ ग्राम स्पर्धेत महिमापूर ग्रा.पं.ठरली जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची मानकरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

           दर्यापूर आसेगाव रोडवर खल्लार जवळील महिमापूर हे गाव विहिरीचे म्हणून अमरावती जिल्ह्यात परिचित आहे. या गावाला आणखी एक ओळख मिळाली आहे. जिल्हास्तरीय स्वच्छ ग्राम स्पर्धेत महिमापूर ग्राम पंचायतने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.

               संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हातील ५९ जि. प.गटातील जास्तीत जास्त गुण असलेल्या ९ ग्राम पंचायतची जिल्हास्तरीय समिती मार्फत तपासणी करण्यात आली. या तपासणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत महिमापूर ग्राम पंचायतने पहिला क्रमांक मिळविला आहे. दर्यापूर तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळविलेली एकमेव ग्राम पंचायत आहे.

प्रतिक्रिया

 गावातील सर्व नागरिकांच्या सहभागामुळेच प्रथम क्रमांक महिमापूर व मिर्झापूर ही दोन गावे मिळून गट ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतची लोकसंख्या १०८१ असून गावात सर्वजण सलोख्याने राहतात आमचे गाव हे एक आदर्श गाव असून स्वच्छ ग्राम स्पर्धेत गावाला प्रथम क्रमांक मिळाला ही गावासाठी आंनदाची व अभिमानाची बाब आहे. गावातील सर्व नागरिकांचा याकरिता सहभाग असल्यामुळे आम्ही प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सुहास साहेबरावजी वाटाणे

    सरपंच, ग्रा पं महिमापूर