ब्रेकिंग न्यूज…. — मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा गेला जीव. — सोनसरी येथील घटना…

     राजेंद्र रामटेके

तालुका प्रतीनिधी कुरखेडा

       मासे पकडण्यासाठी तलावात टाकलेल्या जाळ्यात मासे अडकलेत.मात्र जाळे उचलण्यासाठी गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

        सोनसरी येथील मोठ्या तलावात युवक मृत्यूची घटना घडली असून मृतक युवकाचे नाव पवन सिवलाल कोडाप रा.डोंगरगाव,वय 28 वर्षे असे आहे.

       पवन कोडाप व शुभम कवडो या युवकांनी मासे पकडण्यासाठी तलावात जाळे टाकले होते.सायंकाळच्या सुमारास दोघेही जाळ उचलण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले.मात्र प्रकृती बीघडल्याने तो पाण्यात पोहू शकला नाही.तो अचानक पाण्यात बुडाला.

       सोबत असलेल्या शुभमने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही.शुभम ने घडलेली घटना गावात येऊन सांगितली.गावकऱ्यांनी मोठ्या तलावात पवनचा शोध घेतला.

       मात्र,जो जाळ कळण्यासाठी पवन तलावात उतरला त्या जाळ्यात मासे अडकले असल्याचे दिसून आले.पवनचा मृत्यूदेह बाहेर काढण्यासाठी शोध मोहीम सुरु आहे.