रात्रोला वाघाचा गोऱ्यावर हल्ला.. — कसे होणार?

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका 

            चिमूर तालुक्यातंर्गत अनेक वाघांचा संचार बऱ्याच गावाशेजारी दिवसागणिक वाढत असल्याने पाळीव प्राण्यांसह नागरिक आता असुरक्षित झाले आहेत.आणि वाघ केव्हा कुणावर हल्ला करतील याचा नेम सुध्दा राहिलेला नाही.

            प्रत्यक्षदर्शी मौजा पारडपार गावातील पाळीव प्राण्यांच्या गोठ्यात गोऱ्यावर वाघाच्या हल्ल्याची घटना परत एकदा समोर आल्याने मनुष्य मन अक्षरशः ढवळून निघाले आहे.

           चिमूर तालुक्यातील मौजा पारडपार येथे आनंदराव जिवतोडे हे आपल्या परिवारासह राहतात.त्यांच्या गुऱ्हांचा गोठा स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या मागे आहे.

          रात्रोच्या वेळी त्यांच्या गुऱ्हांच्या गोठ्यात वाघ शिरला व त्यांने गोऱ्यावर हल्ला करून ठार केले.गोऱ्याला ठार केल्यानंतर शेताकडे त्याला फरकडत नेले.बाकीचे गुऱ्हे जिव वाचविण्यासाठी दोर तोडून पळून गेली.

          वाघाच्या हल्ल्याची माहिती होताच अख्खा पारडपार गावातील नागरिकांत वेगाने हलचल सुरु झाली.आणि नागरिक बोलू लागले वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याच्या घटनेमुळे आमचे व जणावरांचे कसे होणार? या विवंचनेत पडले आहेत.

       अर्थात वाघाच्या गावाशेजारील वावरांमुळे मौजा पारडपार येथील नागरिक व पाळीव प्राणी असुरक्षित झाले आहेत.