Home शैक्षणिक उड्डान प्रकल्पांतर्गत, नं.पा.कापगते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले ध्येय निश्चितीचे धडे..!

उड्डान प्रकल्पांतर्गत, नं.पा.कापगते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले ध्येय निश्चितीचे धडे..!

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

 साकोली :- आज दि.19.09.2025 रोज शुक्रवारला स्थानिक नं.पा.कापगते विद्यालय,साकोली येथील इयत्ता दहावीला शिकणारे 50 विद्यार्थी व श्री.डी. आर.देशमुख व श्री.एस.व्ही.कामथे स.शिक्षक कर्मचारी यांनी उड्डान प्रकल्पांतर्गत अदाणी पॉवर प्लांट, तिरोडा जि.गोन्दिया येथे स.ठीक 10 वा.भेट दिली.

         भेटी अंतर्गत उड्डाणं प्रकल्प मार्गदर्शक यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी “विद्यार्थ्यांनी ध्येयाची जपणूक करून ते गाठण्यासाठी परिश्रमाची आस धरायला पाहिजे.ध्येय गाठत असतानी आपली परिस्थिती कधीच आड येऊ शकत नाही फक्त मेहनत घेण्याची ताकद आपल्यात निर्माण करा, यश आपोआप चालत तुमच्याजवळ येईल व तुमचे जीवन सुखमय होईल” अशा मार्मिक शब्दात उदबोधन केले.

                नंतर सर्व विद्यार्थ्यांना अदानी पॉवर प्लांट चा परिसर व तेथील प्रत्येक झोन मधील मशीनांची कार्यपद्धती या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून थर्मल इलेक्ट्रिसिटी निर्मितीची प्रक्रिया समजावून दिली.

        दरम्यान विद्यार्थ्यांना नास्ता व जेवणाची सोय प्रकल्पांतर्गत पुरविण्यात आली.सरतेशेवटी प्रकल्प भेटीबाबत सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

     सदर प्रकल्पाला भेट देण्याकरिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आर.बी.कापगते यांनी शुभेच्छा व परवानगी दिलेली होती.