दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
सिंदेवाही, १९ सप्टेंबर :- आठ वर्षांच्या मुलांला बिबट्याने हल्ला करून ठार केले असल्याची हृदयद्रावक घटना चंद्रपूर जिल्हातंर्गत शिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे आज घडली.यामूळे मौजा गडबोरी येथील नागरिकांत शोककळा पसरली.
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव कु.प्रशिक बाबन मानकर (८) असे आहे. गावातील मस्कऱ्या तो भोजनाच्या समुदायसाठी गेला होता.
बिबट्याने कुमार प्रशिकला टेकडीकडे ओढत नेले.यामुळे जमावामध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.
गडबोरी गावातील नागरिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले होते.संतापलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली आहे.



