शिवाजी दुसऱ्याच्या नाही तर स्वतःच्या घरी जन्माला घाला- डॉ. सचिन पावडेंनी… — ज्ञानदिप इंग्लिश स्कूल रोहणाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न..

       रोहन आदेवार

साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

       यवतमाळ/वर्धा

आर्वी :- समाजात सुधारणा घडवून आणायची असल्यास,”न्यायप्रिय व समाताधिष्ट व्यक्तीत्व जन्मास आणण्यासाठी उत्तम विचार मनात रुजविण्याची मानसिकता तयार केली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालण्यासाठी स्वत:त वैचारिक व मानसिक सुधारणा घडवून आणली पाहिजे.प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तर देशात समाजीक व इतर प्रकारची न्यायीक क्रांती झाल्यावाचून राहणार नाही अशा प्रकारचे प्रतिपादन डाॅ.सचिन पावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

      तालुक्यातील रोहणा येथील ज्ञानदिप इंग्लिश स्कूल रोहणाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे उपस्थित होते.डाॅ.पावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरूवात झाली.

        त्या नंतर चिमुकल्यानी सुंदर स्वागत गीत म्हणत पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी मंचावरून डॉ. पावडे यांनी पालक व विद्यार्थ्यांना संबोधित केले.संबोधित करताना पालकांनी मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल याबद्दल सविस्तर माहिती दिली.

       घरात छत्रपती श्री.शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती जन्माला येते त्या कुटुंबाला प्रचंड त्याग करावा लागतो,कष्ट सोसावे लागतात.आजकाल,महान कार्य झालं पाहिजे,क्रांती झाली पाहिजे,असे सर्वांना वाटते पण त्याची झळ आपल्याला लागता कामा नये,आपण आपल्या घरी सुखी आहोत तर आपण कशाला त्याग करायचे? कष्ट आणि त्यागाची तयारी आपली नसते म्हणून आपण म्हणतो की, ‘शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात’.असे सर्वांना वाटते.पण तो शिवाजी दुसऱ्याच्या नाही तर स्वतःच्या घरी जन्माला घाला असे प्रतिपादन डॉ. पावडेंनी केले.

      सध्या लहान मुलांचे सर्वात आवडते खेळणे म्हणजे मोबाईल फोन आहे. पूर्वी आई-वडिलांच्या पिशवीतील खाऊची वाट पाहणारी मुले आता पालकांच्या खिशातील मोबाईल शोधत आहेत.मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आजारात वाढ होत आहे. परंतु, मुलगा जेवत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. 

       मग,मोबाईल पाहता-पाहता आई घास भरवते.त्यावेळी जेवणाकडे लक्ष नसते आणि पोट भरल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही.मुलगा जेवल्याचे समाधान पालकांच्या चेहऱ्यावर असते. पण,नंतर पोट दुखण्याचे कारण शोधत बसतात.जेवताना मोबाईल पाहण्याच्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाल्यास अडचणी वाढू शकतात असेही ते म्हणाले.

         यावेळी श्री.शिरीषभाऊ वाघ, अध्यक्ष,धै.वा.ज. सह. प्र. संस्था रोहणा,श्री.जयंतजी दातीर उपसरपंच ग्रा.पं. रोहणा,श्री.फनिन्द्रजी रघाटाटे,अध्यक्ष तंटामुक्त समिती रोहणा,श्री.बाबासाहेब गलाट रोहणा,श्री.सुनिलभाऊ वाघ, माजी सरपंच ग्रा.पं. रोहणा,श्री.राजाभाऊ पावडे, माजी सरपंच, ग्रा.पं. रोहणा,श्री. हितेंद्रजी बोबडे,माजी जि.प. सदस्य रोहणा,श्री.वैभवभाऊ जगताप,माजी पं.स. सदस्य रोहणा,श्री.भिमरावजी कुन्हाडे, संचालक,कृ.उ.बा.स. आर्वी, सौ. अरुणाताई कडू अध्यक्षा,से. सह.सो.रोहणा,श्री.राजुभाऊ हिवसे रोहणा, श्री.प्रविणभाऊ गेडे रोहणा,श्री.पंकजभाऊ नायसे सरपंच,राजेंद्र लक्ष्मणराव नाखले, सचिव,ग्रा.प. शि. संस्था व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.