राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने अनिल किरणापुरे सन्मानित…  — कृषी विज्ञान मंच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान कार्यक्रमाचे औचित्य…

 संजय टेंभुर्णे 

कार्यकारी संपादक 

         समाजसेवक तथा पंचायत समिती सदस्य अनील किरणापूरे यांच्या विविध कार्याची दखल घेत कृषी विज्ञान मंच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान तर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांना राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

        भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड राज्यस्तरीय कृषी गौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किसनराव मुळे उपसंचालक कृषी अमरावती विभाग हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कॅप्टन कलंत्री सर निवृत्त रेशीम संचालक नागपूर हे होते.

        प्रमुख अतिथीमध्ये रेशीम संचालक नागपूर श्री महेंद्र ढवळे,प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉक्टर विजयराव माने भाऊसाहेब आणि कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेती मित्र अशोक वानखेडे,आपले अध्यक्ष शिवाजीराव माने,उपविभागीय कृषी अधिकारी समाधान धुळे,तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवणकर,माजी आमदार प्रकाश पाटील,माजी आमदार विजय खडसे, जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एन.डी. पारलावार,रेशीम विकास अधिकारी यवतमाळ श्री शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          या महत्वपूर्ण कार्यक्रमात परिसरातील हजारो शेतकरी,महिला,पत्रकार,विद्यार्थी आणि इतर प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी व तालुक्यातील कृषी क्षेत्रातील सर्व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

         कार्यक्रमात देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार,सत्कारमूर्ती बाबत माहिती,शेतकऱ्यांबाबत विचारांची देवाण-घेवाण यावर सखोल माहिती देण्यात आली.

        मार्गदर्शनाचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होऊन कृषी उन्नती घडवण्याचे कार्य करीत असते असेही मनोगत पुढे आले.

      यामध्ये प्रामुख्याने,”रोज शेती तोंड पैसा मिळणारा शेतीचा विचार केला जातो,अशा शेतकऱ्यांचा सन्मान करून उन्नत शेतकरी घडवण्याचा मुख्य उद्देश गौरव पुरस्कार कार्यक्रमाचा आहे असे आयोजकांनी सांगितले.