आदित्य चेडगे व श्रेया तिरपुडे यांना उपराजधानीत “नागपूर उद्योग भूषण पुरस्कार”… — अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्या हस्ते शिवराय नेट कॅफे साकोली :- लाखनीला पुरस्कार प्रदान… 

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

             साकोली : महाराष्ट्राच्या उपराजधानीतील नागपूर उद्योग भूषण पुरस्कार सोहळा महानगरातील रिजेन्टा सेंट्रल हॉटेल, जगनाडे चौक येथे शनिवार १६ डिसेंबरला पार पडला. यात प्रमुख अतिथी चित्रपट अभिनेते गुलशन ग्रोवर, आमदार अभिजीत वंजारी, निलेश साबळे यांसह नागपूर उद्योग जगतातील सर्व आमंत्रित मान्यवर हजर होते. 

            या वर्षीचा बेस्ट स्टार्ट अप बिझनेस अवार्ड नागपूर उद्योग भूषण पुरस्कार हा भंडारा गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला. यात साकोली येथील शिवराय नेट कॅफे संचालक आदित्य चेडगे आणि लाखनी येथील श्रेया तिरपुडे यांना अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

               सदर पुरस्कार हा भंडारा जिल्ह्यासाठी गौरवपूर्ण बाब असून साकोली व लाखनीला याचा बहुमान मिळाला आणि या पुरस्काराचे श्रेय भंडारा गोंदिया जिल्ह्याला आले आहे.

            याबद्दल साकोली शहरातील श्री बाल गणेश उत्सव मंडळ, साकोली मिडीया नेटवर्क, फ्रिडम युथ फाऊंडेशन आणि सर्व साकोली लाखनी मित्र परिवारांनी शिवराय नेट कॅफे साकोली संचालक आदित्य चेडगे आणि लाखनीच्या श्रेया तिरपुडे यांना हार्दिक शुभेच्छा देत स्वागताभिनंदन केले आहे.