प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.याचबरोबर समाजाचा आधार व शासकीय-प्रशासकीय कार्यालयाचा आरसा असलेल्या पत्रकारांना व वार्ताहरांना या दिवाळी निमित्ताने आर्थिक सहकार्य करण्याची परंपरा सदर कार्यालयातंर्गत रुढ आहे…
पत्रकार व वार्ताहर यांना दिवाळीला आर्थिक सहकार्य करण्यासाठी शासकीय कार्यालयाला शासन स्तरावरुन निधी प्राप्त होतोय असे म्हटले जातय.
हा निधी कसा प्राप्त होतोय आणि किती प्रमाणात प्राप्त होतोय,ही अंधारातील बाब आहे.तद्वतच शासन स्तरावरुन पत्रकार व वार्ताहर यांना दिवाळी निमित्ताने देण्यासाठी निधी प्राप्त होत नसेल तर मग अंधारच अंधार आणि सावळा गोंधळच गोंधळ आहे असे वाटने गरजेचे झाले आहे!…
दिवाळी निमित्ताने पत्रकार आणि वार्ताहरांना आर्थिक भेट देताना स्वतःला लाज वाटणार नाही आणि शरम येणार नाही,अशी तर आर्थिक भेट पत्रकार आणि वार्ताहरांना दिली पाहिजे?
यावर्षी दिवाळी निमित्ताने शासकीय कार्यालयाद्वारे पत्रकार आणि वार्ताहरांना पाचशे आणि हजार रुपये सदिच्छा आर्थिक भेट म्हणून दिल्या गेली असल्याची माहिती समोर आली आहे.अशी अल्प आर्थिक भेट देणे म्हणजे पत्रकार आणि वार्ताहरांची सरळ सरळ उपेक्षा करणे नाही काय?एक प्रकारची थट्टा करणे नाही काय? आणि बोळवण करणे नाही काय?
शासन स्तरावरुन व शासकीय कार्यालयांच्या द्वारे दिवाळी निमित्ताने वर्षातून एकदा पत्रकार व वार्ताहर यांना आर्थिक मदत करीत असताना सन्मान पुर्वक आर्थिक मदत केली पाहिजे..मग तो दैनिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया,किंवा शोसल मिडीयांचा पत्रकार व वार्ताहर असो,यांच्यात शासन-प्रशासन स्तरावरुन भेदभाव करता कामा नये…
वर्षभर समाजाचा आधार बनवू काम करणारे पत्रकार व वार्ताहर हे फुटक्या कवळीची अपेक्षा ठेवत नाही आणि शासन – प्रशासनाचा आरसा म्हणून सातत्याने सहकार्य करताना स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची पर्वा करीत नाही…
अशा पत्रकारांची व वार्ताहरांची हजार व पाचशे रुपये देऊन बोळवण,उपेक्षा,थट्टा करताना,”जनाची नाही तर मनाची,तरी लाज बाळगायला नको काय?…
पत्रकार आणि वार्ताहर म्हणजे काय? तर देशाचे,राज्याचे,शहराचे, खेड्यातील स्पष्ट संवेदनशील व संवेदनक्षम पुराव्यासह बोलके चित्र आणि देशातील नागरिकांचे संरक्षणकर्ता.त्यांना कर्तव्यासाठी वेळेची तमा नाही व वेळेचे बंधने नाहीत…
अशा कर्तृत्ववान पत्रकारांची व वार्ताहरांची दिवाळी निमित्ताने अल्पशी आर्थिक मदत करुन उपेक्षा करणारे,थट्टा करणारे,बोळवण करणारे,शासन आणि प्रशासनाचे उचित कर्तव्य आहे काय?…काय? भाजीपाला समजतात काय पत्रकार आणि वार्ताहरांना?
अहो? दिवाळी निमित्ताने पत्रकार व वार्ताहरांना आर्थिक सहकार्य करतांना शासन-प्रशासनाचे मन व कर्तव्य हे प्रामुख्याने खुल्ले व सन्मानपूर्वक नसेल तर अशा मदतीचा काय उपयोग?…
सोशल मीडिया सुध्दा शासनमान्य रजिस्टर आहे,याचे भान शासन-प्रशासनाला का म्हणून नाही? सोशल मिडीयांच्या बाबतीत ते का म्हणून मोघम भुमिका घेतात? सोशल मीडिया मुळेच जगामध्ये वेगाने वैचारिक व सामाजिक क्रांती झाली,अन्याय-अत्याचार तात्काळ कळू लागले,हे शासन व प्रशासनाने अजिबात विसरू नये…
सोशल मिडीयांच्या व इतर पत्रकारांनी आणि वार्ताहरांनी बुळाला आग लागने सुरू केले तर तोंड लपवायला जागा शिल्लक राहणार नाही,याचेही भान शासन – प्रशासनाला असणे आवश्यक आहे….
पत्रकार व वार्ताहर यांची मोठी शक्ती डोके ठिकाणावर लवकर आणतय हे समाजमनाला चांगलेच ठाऊक आहे….
शासन- प्रशासनाला प्रश्न आहे,दिवाळीचे आगाऊ भत्ते,बोणस,शासकीय कर्मचाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना मिळत असतील तर दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक कार्यालयातंर्गत प्रत्येक पत्रकारांना आणि वार्ताहरांना किमान ५ हजार रुपये तरी द्याना?


