Home Maharashtra वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू .. — लावारी- चौरस्ता येथील घटना..

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू .. — लावारी- चौरस्ता येथील घटना..

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

       चिमूर वनपरिक्षेत्रात येत असलेल्या भिसी परिसरातील लावारी चौरस्ता येथे वन क्षेत्रा लगत शेत शिवारात आज दिनांक 18 सप्टेंबर ला सकाळी १० वाजताच्या दरम्यान सौ.विद्या कैलास मसराम वय वर्ष 40 या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे.ही महिला कामानिमित्त वन परिसरात लागून असलेल्या शेत शिवारात गेली होती.. 

 

       त्या ठिकाणी धब्बा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हमला करून ठार केले.या घटनेची माहिती परिसरात होतास गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

            त्या ठिकाणी जमाव झाल्याने पोलीस प्रशासनाला प्राचारण करण्यात आले होते.दरम्यान भिसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोंगडे घटनास्थळी दाखल होऊन कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी जमावाला पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला. 

       त्या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी पंचनामा करून संबंधित बॉडीला पी.एम.साठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून मयत महिलेच्या कुटुंबाला तातपूर्ती पन्नास हजार,दहा लाख रुपये चेक वनविभागाकडून आर्थिक मदत देण्यात आली.

       या परिसरात वाघांची संख्या जास्त असल्याने अनेक गावे दहशतीत आहेत वन विभागाने येथील वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली असून महिलेच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची मागणी सुध्दा येथील नागरिकांनी केली आहे.