अबोदनगो एस चव्हाण
जिल्हा प्रतिनीधी अमरावती
दखल न्युज भारत
चिखलदरा शहरातील ऐतिहासिक व निसर्गरम्य शक्कर तलाव परिसर पर्यटनदृष्ट्या एक मोठे आकर्षण मानले जाते. शहराच्या मध्यभागी असलेल्या या तलावाच्या सुशोभीकरणासाठी शासनाने तब्बल पाचशे कोटी रुपयांचा पुल मंजूर केला नागरिकांना व पर्यटकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन पर्यटनाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक कामे हाती घेण्यात आली.
मात्र या प्रकल्पातील बहुतेक कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे वास्तव समोर आले असून यामुळे केवळ शासकीय निधीचा अपव्यय झाला नाही तर पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
पादचारी पुल बंद गेटला कुलूप…
तलाव परिसरात पर्यटकांसाठी पैदल फिरण्यासाठी विशेष पादचारी पुल बांधण्यात आला. या पुलावरुन तलाव व परिसराचे दृश्य पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळावा हा उद्देश होता मात्र बांधकामाचे काम दर्जाहीन झाले असून पुलावर खड्डे सोडले आहेत. पाच वर्षापासुन काम सुरु होते. सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने पुल पर्यटकांसाठी बंद केला आहे. पुलाच्या प्रवेशद्वाराला ताला ठोकण्यात आला आहे परिणामी मोठ्या अपेक्षेने बांधलेले हे काम उपयोगात येण्या आधीच बंद झाले आहे.
कोट्यवधींचा निधी वाया शक्कर तलाव परिसरात बांधकाम, सुशोभीकरण रस्ते लाइट्स बगीचा आदी अनेक कामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र बहुतेक ठिकाणी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात काँक्रीटचे रस्ते उखडू लागले आहेत. बगीच्यातील गवत व झाडे वाळली असून देखभाल नसल्याने परिसराची शोभा कमी झाली आहे.
पर्यटकांसाठी करण्यात आलेल्या अनेक सुविधा बंद अवस्थेत आहेत पर्यटकांमध्ये नाराजी चिखलदरा शहरातील नागरिक तसेच बाहेरील पर्यटक शक्कर तलाव परिसराला भेट देतात. मात्र कामांचा दर्जा पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे शासनाकडून एवढा मोठा निधी खर्च करुनही जर अशीच कामे व्हायची असतील तर हा पैसा वाया गेला असे नागरिक सांगत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार न करता फक्त कागदावर पुल दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असा आरोप होत आहे.
चौकशीची मागणी पाचशे कोटी रुपयांच्या हा पुल चिखलदरा शहराला एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ मिळावे अशी अपेक्षा होती. मात्र आजच्या घडीला तलाव परिसरातील स्थिती पाहता कामांचा दर्जा प्रश्नचिन्हाखाली आला आहे स्थानिक नागरिक व उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच बंदिस्त केलेला पादचारी पुल तातडीने दुरुस्त करून सुरक्षित करावा परिसरातील अन्य कामांचेही पुनरावलोकन व्हावे अशी मागणी होत आहे पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या.
शक्कर तलाव हा शहराचा अभिमान मानला जातो येथे दररोज शेकडो पर्यटक फिरायला येतात अशा ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जामुळे सुविधा बंद कराव्या लागत आहेत हे नागरिकांसाठी मोठे दुःखद व संतापजनक असल्याचे व्यक्त केले जात आहे.



