राजेशाही,हुकुमशाही,भांडवलशाही या प्रक्रियेतून जग बदलत आहे,कारण लोकांची समज मधे जसा जसा बदल होत जाईल ,आणि आर्थिक शोषणाचा ढाचा जसा बदलेल त्यानुसार सत्तेचा ढाचा ( आकार आकृती ) पण बदलत असतो.सरंजामशाहीतील जो राजा क्रूर असेल,,म्हणजे जनतेचा छळ करणारा असेल.अन्याय अत्याचार करणार असेल त्या राजाविरुद्ध जनता पेटून उठे, बंड करीत असे.आणि जो राजा दयाळू मायाळू जनतेवर प्रेम करणारा ,जनतेची काळजी घेणारा (जात धर्म हा भेदभाव न करता) असेल,त्या राजाला जनता सहकार्य करीत असे.
जगात दोन जागतिक महायुद्धे झाली,महायुद्ध म्हणजे जगात जेव्हढे राजे आहेत,त्यांचे दोन गटात संघटन होऊन या दोन संघटनातील युद्ध म्हणजे जागतिक किंवा विश्वयुद्ध होय,असे विश्व युद्धे दोन झाली.दुसऱ्या महायुद्धानंतर लोकशाहीचा जन्म झाला.कारण जगातील जनता सरंजामशाही म्हणजेच घराणेशाही,म्हणजेच राजेशाही,म्हणजेच हुकुमशाही,म्हणजेच वंशवाद.यास कंटाळलेली होती.कारण कित्येक पिढ्या नंतरही लोकांच्या आर्थिक परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता,सामाजिक व्यवस्था बदलत नव्हती,गरीबी आणि अस्पृश्यता ही पाचवीलाच पुजलेली होती,तिचा त्रास वेदना जनतेस होत होत्या,गरीबी आणि अस्पृश्यता मुळे आर्थिक सामाजिक राजकीय विकासाची दारे बंद होती.ती दुसऱ्या महायुद्धामुळे खुली झाली.
कारण दुसरे महायुद्ध हे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असे होते.लोकांना लोकशाही प्रस्थापित करायची होती.हे जरी खरे असले तरी सरंजामशाही विरुद्ध भांडवलदार अशी ही लढाई होती.म्हणून भांडवलदारांना आपला विकास साधण्यात सरंजाम राजे विरोध करीत होते.देशोदेशीचे सरंजामी सरकारे हे साम्राज्यशाहीच्या विरोधी होते,आणि जनता पण साम्राज्यवादी भांडवलदारांच्या विरोधी होती.जागतिक भांडवलदार यांना आपल्याच नव्हे तर साऱ्या जगात आपल्या कारखान्यात तयार झालेला माल किंवा वस्तू विकायच्या होत्या.कारण उत्पादन जास्त झाले की,आपल्या देशातील ग्राहकांचे खरेदी करणे झाले की,उरलेला माल बाहेरच्या देशात विकण्याची गरज निर्माण होते,यासाठी जागतिक भांडवलदार एक होतात,संघटित होऊन,त्या त्या देशातील सरकारशी करार करतात,त्यात यश येत नसेल तर त्या त्या देशातील सत्तेत पालट करतात,सत्ता बदलतात.या प्रक्रियेत त्या त्या देशातील ग्राहकांचा त्यांना पाठिंबा मिळतो.
कारण हाताने बनविलेल्या वास्तूच्या किमतीपेक्षा कारखान्यात बनविलेल्या वस्तू लोकांना स्वस्त मिळतात.मग ग्राहक हा गरीब असो की श्रीमंत तो किंमत कमी आणि दर्जेदार वस्तूच खरेदी करतो,यामागे त्याचा स्वार्थ आणि परिस्थिती पण असते.म्हणून कोणत्याही देशातील ग्राहक हा वस्तू स्वदेशी की परदेशी असा फरक किंवा भेदभाव करीत नाही,जे स्वस्त आणि मस्त ते तो खरेदी करतो,घेतो,स्वीकारतो.या कारणामुळेच भाँवलशाहीचा जन्म झाला.जागतिक भांडवलदारांनी साऱ्या जगात भांडवलशाही निर्माण केली.सरंजामशाही संपविली.ती लोकांच्या सहाय्याने,म्हणून भांडवलदार यांना राजेशाही पेक्षा लोकशाही जवळची वाटते,म्हणून दुसऱ्या महायुद्धातून लोकशाही जन्मास आली.पण ती भांडवलदारांनी लोकशाही म्हणूनच. जगात आज बहुतांशी देशात भांडवली म्हणजेच पुन्जीवादी लोकशाही अस्तित्वात आहे.
याचा अर्थ ज्यांच्याकडे कारखाने आणि कंपनीज आहेत,त्यांचेच सरकार सत्तेत आहे,बहुजन वंचित,गरीब,मध्यम वर्गाचे सरकार नाही,हे केवळ मतदार म्हणजे मत दान करून मोकळे होणारे आहेत.दान म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता देणे.परंतु हल्ली श्रीमंत लोक मताचे दान न मागता ते एक वस्तू विकत घ्यावी ,तसे त्याची किंमत पैश्यात करून विकत घेत आहेत.याचा त्यांना फायदा हा की,यामुळे मतदारास आता जाब विचारायचा अधिकार नसेल.निवडून गेलेल्या उमेदवारास आपल्यासाठी सरकारी योजना,सुखसोयी नाहीत,म्हणून तक्रार करण्याचा अधिकार नसणार.हेच तर बोक्याना हवे,कारण लोण्याच्या गोळ्यात कुणाचाही वाटा नको आहे.
असो अशाप्रकारे पुन्जीवादी लोकशाहीत असे घडणारच असते.म्हणून यात दुःख होण्याचे काही कारण नाही.आणि यास काही उपाय पण नाही.कारण भानवलशाही अर्थव्यवस्थाच मुळात खरेदी विक्री नफा या तत्वावर आधारित असते.दोष कुण्या एका व्यक्तीचा,सरकारचा,नसून तो व्यवस्थेचा आहे.व्यवस्थेत दोष असले,म्हणजे दोषी व्यवस्था असली की,त्याचे दुष्परिणाम त्या व्यवस्थेत राहणाऱ्या सर्वच जाती धर्म वर्गाच्या लोकांना भोगावे लागतात.
आर्थिक आणि सामाजिक विषमता जगात आहे.आपल्या देशात तर अधिकच आहे.आणि निवडून येण्यासाठी गट त ट ,जाती धर्म,गरीबी ही उपयोगाची असते.पूरक असते.म्हणूनच या गोष्टी ,म्हणजेच अनेक पक्ष म्हणजे राजकीय फूट, अनेक जाती म्हणजे सामाजिक फूट, अनेक धर्म म्हणजे समाजाचे मोठमोठे समूह (छोटी छोटी तळे म्हणजे जाती,मोठमोठी धरणे म्हणजे धर्म) यांना इथेच आडवायचे,त्यांना विशाल अशा समुद्राला जाऊन मिळू द्यायचे नाही.असे हे दुष्ट धोरण म्हणजे नफा कमावणाऱ्या शेठजींचे,राज्य करणाऱ्या लाटजींचे,आणि धर्माला अंकित ठेवणाऱ्या भटजींचे ( म्हणजे पोटभरु ऐतखाऊ पुजारी,धर्मगुरु, मुल्ला मौलवी, पाद्री, भंते ). जातीचे ठेकेदार म्हणजे जातींचे पुढारी,धर्माचे ठेकेदार धर्मगुरु,आणि सत्तेचे ठेकेदार म्हणजे राजकीय पुढारी हे सारे भांडवलशाहीचे खांदे पुरस्कर्ते म्हणजे भानवलशाहीला खांद्यावर घेऊन नाचणारे दलाल, भटगिर.
थोडक्यात काय तर ज्या विषमतावादी आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत लोकशाही आहे,ती खरी लोकशाही नसते,तर खरी लोकशाही ही समतावादी व्यवस्थेतच असते.म्हणजेच समाजवादी किंवा साम्यवादी व्यवस्था ,अशी व्यवस्था की,ज्या व्यवस्थेत,वर्गातील अंतर हे वाढत वाढत जाण्याऐवजी कमी कमी होत जाते.जाती मजबूत होण्याऐवजी क्षीण होत जातात.
धर्मांधता,अंधश्रद्धा अधिक अधिक वाढणे पेक्षा कमी कमी होते.भ्रष्टाचार,काळाबाजार,साठेबाजी,बेकारी तर दिसणारच नाही.अशी समतेच्या वाटेने जाणारी लोकशाही हवी असेल तर आपापल्या जाती धर्म वर्गाना ओलांडून मतदानाचा हक्क जोपासावा लागेल.मतदानातून विषमता जाऊन समता येत नसेल तर सारेलोक रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला पाहिजे.सत्ता बदल मग व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न उराशी बाळगून संघटितपणे ,विचारपूर्वक आणि पर्यायी व्यवस्थेची रचना डोळ्यासमोर स्पष्ट ठेऊनच एल्गार केला तर तो यशस्वी होईल.अन्यथा सारे प्रयत्न निष्फळ ठरतील.
लेखाचा सारांश हा की,जात धर्माचा आधार घेऊन खरी लोकशाही रुजणार नाही,ही बेगडी लोकशाही असेल.त्यासाठी वर्गीय दृष्टिकोन घेऊन ,ठेऊनच सत्ता आणि व्यवस्था बदलावी लागेल.प्रवर्गाचे संघटन करून पण स्वप्न साकारणार नाही.प्रवर्ग म्हणजे शेवटी काही जातींचे एक गाठोडे बांधणे.याचा अर्थ जात ही डोक्यात घेऊनच,ठेऊनच व्यवस्था बदल शक्य नाही.तर वर्गाच्या आधारेच केलेली क्रांती सफल होईल.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक : 17 ऑगस्ट 2025.फोन : 9420912209.



