पत्रकाराला धमकी देणाऱ्या त्या ठेकेदारा विरोधात दर्यापूर पोलिसात गुन्हा दाखल…

 

युवराज डोंगरे

उपसंपादक

           दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून थिलोरी ते गणेशपुर कडे जाणाऱ्या थिलोरी गावाजवळ असलेल्या पूलाचे बांधकाम सुरू आहे .शासनाच्या वतीने या पुलाच्या बांधकामा करिता 80 लाख रुपये निधी प्राप्त झालेला आहे. मात्र संबंधित ठेकेदार बोबडे हे या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करत असून या बांधकामाकरिता लोहा सिमेंट हा सुद्धा निकृष्ट दर्जेचा वापरण्यात येत असल्याची तक्रार थिलोरी येथील रहिवाशी आकाश वाकपांजर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांच्याकडे 17 मे रोजी लेखी स्वरूपात केलेली होती . व त्या तक्रारीच्या आधारे जनविकास न्यूज मध्ये पुलाचे होत असलेल्या निकृष्ट बांधकाम संदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदार बोबडे यांनी जनविकास न्यूज च्या संपादकाला फोन केला व माझ्या सुरू असलेल्या कामासंदर्भात बातमी का लावली असे बोलत फोनवर व व्हाट्सअप वर मेसेज करून संबंधित पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जनविकास न्यूजच्या संपादकाने दर्यापूर पोलीस स्टेशन येथे काल 17 मे रोजी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास संबंधित ठेकेदार विरोधात तक्रार दाखल केली आहे .व दर्यापूर पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे ठेकेदाराविरोधात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचा पुढील तपास आता दर्यापूर पोलीस करीत आहे.