राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय केंद्र स्तरावर प्रथम… — मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत मूल्यांकन…

   चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

           स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय तालुकास्तरीय मूल्यांकन पंचायत समिती केंद्र लाखनी यांच्या माध्यमातून घेण्यात आले. यात विद्यालयाचा केंद्रात प्रथम क्रमांक आला असून तालुकास्तरीय मूल्यांकन करण्यासाठी लाखनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, गट समन्वय अधिकारी के टी हरडे, विशेष साधन व्यक्ती गिरीश बांते, सुधाकर झोडे, केंद्रप्रमुख श्रीमती सुनिता मरसकोल्हे उपस्थित होत्या.

           शाळेचे मुख्याध्यापिका सौ.मीरा विजय बारई यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केलं. राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय ही तालुक्यातील एकमेव निःशुल्क मुलींना शिक्षण देणारी शाळा असून विद्यालयात ग्रामीण भागातून गरीब विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मुलींवर योग्य संस्कार आणि जीवनमूल्ये रुजविण्याचा सतत प्रयत्न केला जातो.

             येथील विद्यार्थिनी देश विदेशात आजही मोठ्या पदावर कार्य करीत आहेत. शाळेत विविध उपक्रमांतून विद्यार्थिनींना दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याच सोबत विद्यालयातील शिस्त, स्वच्छ परिसर आणि शैक्षणिक दर्जा ही सुयोग्य आहे. यामुळे राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी तालुक्यातील प्रथम क्रमांकाची शाळा ठरली आहे.

           मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यासाठी शाळेतील सौ.सुनीता खंडाईत, सौ.निधी खेडीकर, सौ.प्रीती पाटील, सौ.माधुरी लाडे, सौ.शारदा कानतोडे, सौ.रेखा घावडे, कुमारी राजश्री चव्हाण, सौ.कल्पना गायधनी, विलास गायधनी, होमेश्वर गोमासे, विनोद कावळे, ब्रह्मा खंडाईत, गोपाल चाचेरे या सर्वांचे सहकार्य लाभले. केंद्रप्रमुख आत्राम तसेच राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी सर्वांचे कौतुक केले.